दिवाळी सुट्टीत कोल्हापुरातील सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरु
schedule16 Oct 25 person by visibility 118 categoryराज्य

कोल्हापूर : 20 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. या कालावधीत छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सोमवार, 20 व बुधवार 22 ऑक्टोबर रोजी सुरु तर मंगळवार 21 व गुरुवार, 23 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे.
या कालावधीत अपघात विभाग नेहमीप्रमाणे पूर्ण वेळ (24X7) सुरु राहील. जिल्ह्यातील सर्व नागरीक तसेच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी याची नोंद घ्यावी,
असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भूषण मिरजे यांनी केले.