SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संयुक्त संगमनगर तारदाळ श्रीराम चौक येथे श्रीराम नवमी उत्सव उत्साहात महिला व बालकांच्या पोषणात लक्षणीय सुधारणेचे उदिष्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनआदर्श फौंडेशनचा पुरस्कार प्रदान समारंभ उत्साहात बुवाबाजीविरोधात अंनिसची निदर्शने; नाट्यप्रयोगांतून करणार जनजागृती, १२ एप्रिलला बुवाबाजी विरोधी सत्यशोधन परिषदआरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज : ब्रिगेडिअर डेचेन चोएडेनइनोव्हेटर्स विद्यार्थ्यांना स्टार्टअप्ससाठी सुवर्णसंधी केआयटी च्या सहकार्याने मिळणार २-१० लाखाची डीएसटी इग्निशन ग्रांट उपलब्धभगवान महावीर जयंती: अहिंसा आणि शांततेचा महामंत्रअवसायनातील दूध संस्थांच्या न्यायासाठी ‘गोकुळ’ची ठाम भूमिका : चेअरमन नविद मुश्रीफशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'शिवशाही पुनर्वसन' प्रकल्पाला बळकटी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जाहिरात

 

आदर्श फौंडेशनचा पुरस्कार प्रदान समारंभ उत्साहात

schedule31 Mar 26 person by visibility 145 categoryसामाजिक

कोल्हापूर : येथील शाहू स्मारक आदर्श फौंडेशन पर्सनल ऑफ द इयर २०२६ समाज गुणगौरव संमेलन तसेच पुरस्कार प्रदान समारंभाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन *माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. 

यावेळी डॉ. सुजित मिणचेकर  म्हणाले, आदर्श फौंडेशनच्या माध्यमातून समाजातील सामाजिक, कला, क्रीडा सांस्कृतिक, तसेच चळवळ अशा विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते ही बाब कौतुकास्पद आहे.


 यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल असे पुरस्कार म्हणजे इस्लामपूरच्या शिक्षिका  मंदाकिनी झाडे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला तर कोल्हापूर महानगरपालिका भूमिअभिलेख विभागातील  घुणकी गावच्या श्रीमती वनिता उदय चव्हाण यांना आदर्श माता पुरस्कार देण्यात आला. 

 मिणचेकर म्हणाले की, पुरस्कार  प्राप्त व्यक्तींनी आपली जबाबदारी वाढली आहे असे समजून आताच्या युगात युवावर्ग आज दिशाहीन झाला आहे, त्याला योग्य दिशा देऊन त्यांना प्रवाहाबरोबर आणण्यासाठी सर्वांनी कार्य करावे. तसेच या फौंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व सामाजिक जन जागृती असे अनेक समाजपयोगी आदर्शवत उपक्रम राबविण्यात येतात. समाजात प्रत्येक सण कसे साजरे करावेत व त्याचे महात्मे सांगण्याचे काम आदर्श फौंडेशनचे अध्यक्ष विजय लोहार व त्याचे सहकारी करत आहेत. 

 यावेळी प्रा.अरुण घोडके  प्रसिद्ध शिवशंभू व्याख्याते व विचारवंत, डॉ. अनिल दूधभाते प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पुणे, पोपटराव ताकवणे सामाजिक कार्यकर्ते, दयानंद लोहार प्रसिद्धी कृषी तज्ञ, अर्जुन जाधव  आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes