SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरीअवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकअधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी २ ते ८ एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ तृतीययशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटसाठी शासनाकडून ९ कोटींच्या बांधकामास प्रशासकीय मान्यताकोल्हापुरात 'पुनर्चक्रीकरणाची भिंत' उपक्रम; कचरामुक्त शहरासाठी 'अवनी'चा पुढाकारकोल्हापूर: फुलेवाडीतील सुपर बाजारला भीषण आग; लाखोंचे नुकसानलाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा....हनुमान जयंती: शक्ती, भक्ती आणि समर्पणाचा महाउत्सवदख्खनचा राजा श्री जोतिबाचा पालखी सोहळा; पावसाची हजेरी

जाहिरात

 

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटसाठी शासनाकडून ९ कोटींच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता

schedule02 Apr 26 person by visibility 107 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाकडून सुमारे ९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांतून हा निधी प्राप्त झाला आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सन २०११-१२ मध्ये विद्यापीठास यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट हा विभाग महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झाला. सदर योजनेअंर्तगत इमारतीचा तळमजला बांधण्यासाठी १० कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाले. सदर अनुदानातून शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तळमजल्याचे काम पूर्ण झाले. या इमारतीचे उद्घाटन सप्टेंबर २०२५ मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी या इमारतीच्या पहिल्या मजल्यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार शासन निर्णय क्रमांक बांधका-२०२६/ई-१५९३४८५/विशि-२ दि.२५ मार्च २०२६ अन्वये ९ कोटी १९ लाख ४४ हजार ८२० रुपये इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये पहिल्या मजल्याचे अंदाजित २२,०५९ चौरस फुट इतके बांधकाम प्रस्तावित आहे.

सदर अनुदान मंजूर होण्यासाठी मंत्री श्री. पाटील यांच्यासह विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्यापीठाचा अभियांत्रिकी विभाग, महाविद्यालये व विद्यापीठ विकास विभाग आणि संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग (पुणे) यांनीही प्रयत्न केले.

यापूर्वी विद्यापीठास मंत्री स पाटील यांच्याच पाठपुराव्याने शासनाकडून फेब्रुवारी २०२३ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरुपी जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या कामासाठी सुमारे साडेआठ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती. हे काम वर्षभराच्या अवधीत पूर्ण होऊन भुयारी मार्ग वापरातही आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes