SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दुधगंगा डावा कालव्यातील नादुरुस्त गेट दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण होणार‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरीअवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकअधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी २ ते ८ एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ तृतीययशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटसाठी शासनाकडून ९ कोटींच्या बांधकामास प्रशासकीय मान्यताकोल्हापुरात 'पुनर्चक्रीकरणाची भिंत' उपक्रम; कचरामुक्त शहरासाठी 'अवनी'चा पुढाकारकोल्हापूर: फुलेवाडीतील सुपर बाजारला भीषण आग; लाखोंचे नुकसानलाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा....हनुमान जयंती: शक्ती, भक्ती आणि समर्पणाचा महाउत्सव

जाहिरात

 

राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ तृतीय

schedule02 Apr 26 person by visibility 84 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (नवी दिल्ली) यांच्या वतीने हैदराबाद येथे झालेल्या आठव्या राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

हैदराबाद येथील मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठात १ व २ एप्रिल २०२६ या कालावधीत राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा २०२५-२६ पार पडली. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचा एकूण १५ सदस्यांचा संघ सहभागी झाला. त्यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सईद ऐनुल हसन यांच्या हस्ते तृतीय क्रमांकासाठीचा चषक आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

या संघात अभय विजय हावळ, मुनाफ रियाज अहमद खान, सूरज महादेव कांबळे, स्नेहल सत्येंद्रकुमार चव्हाण, किरण सूर्यकांत भाकरे, तनुजा रावसाहेब कांबळे, मृण्मयी सदाशिव पांचाळ, सुधांशू गौतम तांबे, विपश्यना भिकाजी कामत आणि निहाल अलनिसार रुकडीकर यांचा समावेश होता. संघाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ऋषिकेश देशमाने आणि सुमंत कुलकर्णी यांनी काम पाहिले. संघासोबत वादक साथीदार म्हणून देशमाने यांच्यासह कौस्तुभ शिंदे, प्रेम भोसले यांनी काम केले. संघव्यवस्थापक म्हणून चिखली येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्टस् अॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे देवेंद्र श्रीमंत शिंदे आणि महिला संघ व्यवस्थापक म्हणून विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या अधीक्षक सुरेखा आडके यांनी काम पाहिले.

विजेत्या संघाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावलीराम घाणे यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes