SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीनूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही - मंत्री चंद्रकांतदादा पाटीलघरफाळा भरणेसाठी शनिवार व रविवारी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरुभाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जल्लोषात साजराकोल्हापूर शहरात १३ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा; धरणातील पाणीसाठा घटल्याने निर्णयडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाला माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची सदिच्छा भेटकृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात सामाजिक उपक्रम; पांजरपोळ संस्थेतील मुक्या जनावरांना दिला आधारशिये येथे भाजप युवा मोर्चातर्फे दिव्यांगांना मदतीचा हात; कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमबल्क वेस्ट जनरेटर कार्यशाळेतून घनकचरा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन​‘कृषी मित्र’ भरतीचा बोगस धंदा; फसवणूक करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

जाहिरात

 

घरफाळा भरणेसाठी शनिवार व रविवारी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरु

schedule12 Jun 26 person by visibility 84 categoryसामाजिक

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने सन 2026-27 या आर्थिक वर्षातील घरफाळा महापालिका करामध्ये 6 टक्के सवलत योजनेचे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. ज्या मिळकतधारकांनी अद्यापही आपला घरफाळा भरणा केलेला नाही. त्यांनी 30 जून अखेर घरफाळा बिल भरुन 6 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. 

दि.1 एप्रिल 2026 ते दि.12 जून 2026 अखेर 45,081 इतक्या मिळकतधारकांनी रु. 20 कोटी 21 लाख इतकी रक्कम भरणा करुन 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच, ज्या मिळकधारकांना अद्यापही पोस्टा मार्फत बिल मिळाले नसलेस त्यांनी जवळच्या विभागीय कार्यालयात जावून दुबार बिलाची प्रत प्राप्त करुन घेऊ शकतात. 

तसेच महापालिकेच्या कोणत्याही नागरी सुविधा केंद्रात जावून आपला करदाता क्रमांक सांगून चालू वर्षाची रक्कम भरुन 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घेता येईल. तसेच, गुगल पे, फोन पे, पेटीएम, महापालिकेच्या वेबसाईट व नागरी सुविधा केंद्रांमधील किओस्क् मशिनवरुन ऑनलाईन पध्दतीने कराचा भरणा करता येईल. नागरीकांचे सोयीस्तव महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सकाळी 9 ते सांयकाळी 4:30 पर्यंत तसेच शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवशी देखिल सुरु राहणार आहेत. दि.13 ते दि.28 जून 2026 रोजी सकाळी 09:00 ते दुपारी 04:30 वाजेपर्यंत, दि.29 ते 30 जून 2026 रोजी सकाळी 09:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तरी शहरातील नागरीकांनी या 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes