पिंपळगाव येथे सर्व रोग निदान महाआरोग्य शिबीराचे आयोजन
schedule01 Nov 25 person by visibility 136 categoryआरोग्य
कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ३ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भव्य 'सर्व रोग निदान महाआरोग्य शिबीर' आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना सर्व प्रकारची तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत मिळणार आहेत.
शिबिर सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत असणार असून शिबिरात सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यामध्ये ० ते १५ वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी व मोफत पुढील उपचार, तसेच १५ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती व सर्व ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहे.