SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन व स्वागतविधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद!श्री अंबाबाई मंदिरातील विविध विकास कामांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार शुभारंभशालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार; राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभशिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेसाठी असलेली अधिवास प्रमाणपत्राची अट रद्दकोल्हापूर : जलजन्य व किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांसाठी जाहीर आवाहनजागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त मंगळवारी क्रीडा ज्योत रॅलीआजरा येथे मंगळवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनडी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा 42 वर्षांचा प्रवास अभिमानास्पद; डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन, 43 वा स्थापना दिन उत्साहातराजर्षी शाहू व्याख्यानमाला व पुरस्कारासाठी करवीरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जाहिरात

 

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन व स्वागत

schedule20 Jun 26 person by visibility 152 categoryराज्य

कोल्हापूर :भारताचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचे शुक्रवारला रात्री उशिरा कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. ते कोल्हापूर इचलकरंजीच्या एकदिवशीय दौऱ्यावर आले आहेत. रात्री त्यांचा मुक्काम शासकीय विश्राम गृहावर आहे.
      
 कोल्हापूर विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी खासदार धनंजय महाडिक,विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा,जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड,जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, विजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज २० जूनला शनिवारी सकाळी ११ वाजता श्री. महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील अन्य सदस्य यासाठी उपस्थित राहणार आहेत.

  मंदिरातील विकास कामाच्या शुभारंभा नंतर  पश्चिम महाराष्ट्र मंदिर विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील परिसराची पाहणी ते करणार आहेत. गेली अनेक शतके भाविकांचे अध्यात्मिक केंद्र असणाऱ्या या मंदिराच्या मूळ वैभवाला पुन्हा उभारण्यासाठी महत्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मंदिराच्या जगविख्यात किरणोत्सवासाठी पूरक व्यवस्था,सुविधा निर्माण करण्याचीही तरतूद आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने भरीव तरतूद केली आहे.

      मंदिर आराखड्यावर चर्चा व पाहणी केल्यानंतर  दुपारी ११. ३० च्या सुमारास पोलीस परेड ग्राउंडवरील जाहीर सभेला गृहमंत्री संबोधित करणार आहेत.

      त्यानंतर दुपारच्या सत्रात ४ वाजताच्या सुमारास इचलकरंजी येथील जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्यात ते सहभागी होणार आहे. त्यानंतर दुपारी ४.४५ वाजताच्या सुमारास कलाप्पांना आवाडे टेक्सस्टाईल पार्क मैदान इचलकरंजी इथे शेतकऱ्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गृहमंत्री कोल्हापूरवरून मुंबईला प्रस्थान करतील.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes