राजर्षी शाहू व्याख्यानमाला व पुरस्कारासाठी करवीरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
schedule19 Jun 26 person by visibility 128 categoryराज्य
कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे प्रतिवर्षी 26 रोजी 'राजर्षी शाहू जयंती' साजरी केली जाते. त्यानुसार 21 ते 25 जूनपर्यत राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
26 जून रोजी सायं. 6 वाजता सन 2026 चा जेष्ठ इतिहास संशोधक स्व.डॉ. जयसिंगराव पवार यांना (मरणोत्तर) 'राजर्षी शाहू पुरस्कार' खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यतेखाली प्रदान करण्यात येणार आहे.
सर्व करवीरवासियांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांनी केले .