SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहनहिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहननिवृत्तवेतनधारकांनी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करावेछत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला 24 पासून प्रारंभस्पर्धा परीक्षेच्या तयारीतून निश्चित व्यक्तिमत्त्व विकास : जिल्हाधिकारी अमोल येडगेशिवाजी विद्यापीठाच्या गुणपत्रिकेची प्रत पदवीधरांना तात्काळ देण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे 'पदवीधर मित्र'ला आश्वासनडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी घेतला दुर्गभ्रमंतीचा रोमांचक अनुभवटोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करारगिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा : प्रकाश आबिटकरपीएम ई-बस योजनेतील पायाभूत सुविधांची कामे तांतडीने पूर्ण करा : प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांचे निर्देश

जाहिरात

 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

schedule21 Nov 25 person by visibility 42 categoryराज्य

मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय मुंबई शहर/उपनगर मार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी महामंडळाच्या विविध योजनांकरिता कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बांधवांच्या स्वयंरोजगार, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक उन्नतीसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (पीएम-एजेएवाय) अंतर्गत ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करून जीवनमान उंचावणे हा या योजनांचा मुख्य उद्देश असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. अर्जाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात होणार असून इच्छुक लाभार्थ्यांनी आपले अर्ज https://mpbcdc.maharashtra.gov.in किंवा https://mahadisha.in या संकेतस्थळांवर करावेत. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष कार्यालयात कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

▪️अर्ज करण्यास आवश्यक पात्रता
अर्जदार अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा व त्याचे वय १८ ते ५० वर्षे असावे. वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी तीन लाख रुपये आहे. अर्जदार हा या महामंडळाच्या योजनांचा व इतर वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

▪️अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे
जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या दाखला. पाच पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड ची प्रत.

 कोटेशन व व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या जागेचा पुरावा, व्यवसायानुसार इतर दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल, बँक खाते क्रमांक, पासबुकची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.

 अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ योजना, राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाच्या योजना, एनएसएफडीसी व एनएसकेएफडीसी शैक्षणिक कर्ज योजना या सर्व योजनांची सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी व पात्रतेच्या अटी महामंडळाच्या महादिशा पोर्टलवर उपलब्ध आहेत. तरी सर्व इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी माहिती वाचून घेणे आवश्यक आहे. जास्तीत इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes