SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हवे वाचन अन योगासने..सुंदर बनवूया जगणे...; सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे उद्या वाटपमातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देशगुजरात विमान दुर्घटनेतील मृतांप्रती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दुःख व्यक्तएअर इंडिया AI १७१ विमान अपघात : प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित"डेटा" हे नवसंशोधन व प्रगतीचे इंधन - श्रीनिवास पी. एम; डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘पॉवर बी. आय.’ कार्यशाळा उत्साहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून विमान दुर्घटनेची गंभीर दखल; अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजलीअहमदाबाद विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यूआषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर बसपॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्याबाबत कायदेशीर प्रकिया पूर्ण कराव्यातकोल्हापुरात वाहतूक शाखेतर्फे कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार

जाहिरात

 

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्जासाठी ‘महाडिबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु; नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून

schedule11 Jun 25 person by visibility 282 categoryराज्य

मुंबई :  भारत सरकारमार्फत मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता महाडीबीटी प्रणालीवर नवीन तसेच नूतनीकरण अर्जांसाठी ऑनलाईन स्वीकृती प्रक्रिया  २५ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील नूतनीकरण अर्ज तसेच २०२४-२५ मधील नवीन अर्ज सादर करण्यासाठी १५ जून २०२५ ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे.

सर्व महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर प्राप्त झालेल्या अर्जांची प्रथम प्राधान्याने पडताळणी करून ते ऑनलाईन पद्धतीने मंजूर करावेत. त्यानंतर संबंधित अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांच्या लॉगिनवर तत्काळ पाठवावेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम इ. 11वी, 12 वीसाठीचे (सर्व शाखा, एमसीव्हीसी, आयटीआय आदी) नवीन अर्ज व नूतनीकरणाचे प्राप्त अर्ज 15 जून ते 15 ऑगस्ट 2025 या मुदतीत महाविद्यालयांनी ऑनलाईन अग्रेषित करावेत. वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम, द्वितीय व तृतीय सर्व शाखा कला, वाणिज्य, विज्ञान आदींसाठी नवीन व नुतनीकरणाचे अर्ज 15 जून ते 10 सप्टेंबर 2025 पर्यंत महाविद्यालयांनी ऑनलाईन अग्रेषित करावेत.

वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रथम, द्वितीय, तृतीय अंतिम वर्ष (सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन अभ्यासक्रम, फार्मसी व नर्सिंग अभ्यासक्रम) आदींचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज महाविद्यालयांनी 15 जून ते 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अग्रेषित करावेत.

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहणार नाहीत यांची दक्षता महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर सुनिता मते यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes