SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 68 नागरिकांचे अर्ज दाखलबाल व किशोरवयीन कामगार ठेवणाऱ्यांवर कारवाईअभियंत्यांनी उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात करावीत: डॉ. राजाराम गुरवपरिक्षा कालावधीत 100 मीटर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदीतिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; कोल्हापूर पोलिसांच्या कामगिरीवर ५० हजारांचे बक्षीसकोल्हापूरचे किशोर घाटगे यांची 'ग्राहक संरक्षण समिती'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवडआंतरराष्ट्रीय खेळ दिन: बालपणाचा अविभाज्य आनंद आणि हक्ककोल्हापूर महानगरपालिका : गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमराज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफडॉग शेल्टर, पथदिवे व जनरल बजेटमधील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

जाहिरात

 

महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 68 नागरिकांचे अर्ज दाखल

schedule11 Jun 26 person by visibility 100 categoryसामाजिक

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी व त्यांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. पंरतू या महिन्याच्या 5 तारखेला महापौर परगावी असल्याने हा जनता दरबार आज घेण्यात आला. हा जनता दरबार महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारात 68 नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडत अर्ज दाखल केले. 

या जनता दरबारात महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी नागरिकांच्या तक्रारी व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. तसेच प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जनता दरबारास प्रारंभ करण्यापूर्वी महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जनता दरबारास सुरुवात करण्यात आली.

या जनता दरबारामध्ये विविध विभागाचे 68 अर्ज असून यामध्ये अतिरिक्त आयुक्त कार्यालयाशी 2, उप-आयुक्त कार्यालयाशी 2, नगररचना विभागाशी 26, पाणी पुरवठा विभागाशी 5, विभागीय कार्यालय क्रं.1 कडे 5, विभागीय कार्यालय क्रं.2 कडे 5, घरफाळ विभागाशी 1, आरोग्य प्रशासन विभागाशी 2, इस्टेट विभागाशी 2, अतिक्रमण विभागाशी 5, आरोग्य विभागाशी 5, सामान्य प्रशासन विभागाशी 1, दिव्यांग विभागाशी 1,  उद्यान विभागाशी 1 व केएमटी विभाग 1 अर्ज दाखल झाले आहेत. 

यावेळी उपमहापौर अक्षय जरग, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, नरगसेवक वैभव माने, स्वरुप कदम, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, नगरसचिव सुनील बिद्री, करनिर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड, उपशहर अभियंता सरेश पाटील, अरुणकुमार गवळी, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबंरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes