SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उदगाव ग्रामीण रुग्णालयात २६ पदसंख्या भरतीला मंजुरी : आमदार यड्रावकरसीपीआर नूतनीकरण वास्तूचे जुलैच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन : मंत्री हसन मुश्रीफविनापरवाना क्लासेसविरोधात महापालिकेची संयुक्त कारवाई ; अनअकॅडमी क्लासेस सीलगांधी मैदान परिसरातील 4 हातगाडया व चिंदी विक्रेत्यांची 124 गाठोडी जप्त28 जून रोजी कोल्हापुरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम कोल्हापूर शिवसेनेत मोठा भूकंप: जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा तडकाफडकी राजीनामा!पालघर अपघात : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरिततात्काळ आपत्तीजन्य इशारे प्रसारित होण्यासाठी राज्य शासनाची अर्ली वॉर्निंग सिस्टम अधिक सक्षमगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार : जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलजागतिक नाविक दिन: जागतिक अर्थव्यवस्थेचे अनमोल शिल्पकार

जाहिरात

 

उदगाव ग्रामीण रुग्णालयात २६ पदसंख्या भरतीला मंजुरी : आमदार यड्रावकर

schedule25 Jun 26 person by visibility 100 categoryराज्य

  ▪️१४.२१ कोटींच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात; ३० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय लवकरच सेवेत

  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या उदगाव येथील ग्रामीण रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून २६ पदसंख्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. १४ कोटी २१ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले असून लवकरच हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

  मंजूर पदांमध्ये वैद्य अधीक्षक वर्ग-१ चे १ पद, वैद्यकीय अधिकारी गट-अ वर्ग-२ चे ३ पदे, अधिपरिचारिका ७ पदे, क्ष-किरण तंत्रज्ञ १ पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १ पद, औषध निर्माण अधिकारी १ पद, सहाय्यक अधीक्षक १ पद, कनिष्ठ लिपिक वर्ग-३ चे १ पद, टंकलेखक वर्ग-३ चे १ पद, प्रयोगशाळा सहाय्यक १ पद, कक्षसेवक ४ पदे, शिपाई १ पद, सफाईगार २ पदे आणि वाहन चालक १ पद अशा २६ पदांचा समावेश आहे.

  सध्या रुग्णालयाच्या इमारतीचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही वेगाने सुरू आहे. बांधकाम पूर्ण होताच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने रुग्णालय कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे ग्रामीण रुग्णालय खाटांचे असून येथे स्वतंत्र स्त्रीरोग व पुरुष वॉर्ड, दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, तज्ज्ञ डॉक्टरांसाठी स्वतंत्र कन्सल्टिंग रूम्स, एक्स-रे विभाग, दंतचिकित्सा विभाग, नेत्ररोग विभाग तसेच बालरोग विभाग अशा विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक आधुनिक उपकरणे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि सुरक्षित उपचार व्यवस्था यामुळे हे रुग्णालय ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

  गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, सुरक्षित प्रसूती सेवा आणि नवजात बालकांसाठी विशेष निगा विभागाची सुविधाही येथे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महिला व बाल आरोग्याच्या दृष्टीने या रुग्णालयाचे महत्त्व अधिक वाढणार आहे.

  उदगाव ग्रामीण रुग्णालय पूर्णत्वास आल्यानंतर शिरोळ तालुक्यासह परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून उपचारासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार , त्यामुळे उदगाव हे मेडिकल हब म्हणून लवकरच ओळखले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार असल्याचा विश्वास आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes