SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उदगाव ग्रामीण रुग्णालयात २६ पदसंख्या भरतीला मंजुरी : आमदार यड्रावकरसीपीआर नूतनीकरण वास्तूचे जुलैच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन : मंत्री हसन मुश्रीफविनापरवाना क्लासेसविरोधात महापालिकेची संयुक्त कारवाई ; अनअकॅडमी क्लासेस सीलगांधी मैदान परिसरातील 4 हातगाडया व चिंदी विक्रेत्यांची 124 गाठोडी जप्त28 जून रोजी कोल्हापुरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम कोल्हापूर शिवसेनेत मोठा भूकंप: जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा तडकाफडकी राजीनामा!पालघर अपघात : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरिततात्काळ आपत्तीजन्य इशारे प्रसारित होण्यासाठी राज्य शासनाची अर्ली वॉर्निंग सिस्टम अधिक सक्षमगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार : जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलजागतिक नाविक दिन: जागतिक अर्थव्यवस्थेचे अनमोल शिल्पकार

जाहिरात

 

विनापरवाना क्लासेसविरोधात महापालिकेची संयुक्त कारवाई ; अनअकॅडमी क्लासेस सील

schedule25 Jun 26 person by visibility 128 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विनापरवाना खाजगी क्लासेसविरोधात अग्निशमन व परवाना विभागामार्फत संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली.

  अग्निशमन विभागाने शहरातील ३८ क्लासेसची तपासणी केली होती. यावेळी अग्निसुरक्षा उपकरणे अपुरी असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटिशीची मुदत संपल्यानंतर आज नागाळा पार्क येथील एम्पायर टॉवरमधील अनअकॅडमी क्लासेसवर सीलची कारवाई करण्यात आली. तसेच शहरातील इतर विनापरवाना क्लास चालकांची तपासणी करून तात्काळ अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  ही कारवाई मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्थानक अधिकारी ओंकार खेडकर, दस्तगीर मुल्ला, परवाना निरीक्षक संदीप भोई, आकाश मिणचे, शिवाजी कोकरे, मनीष अतिग्रे तसेच फायरमन अभिजित सरनाईक, शकील पठाण आणि लियाकत बारसकर यांनी केली. शहरातील विनापरवाना व्यावसायिक आस्थापनांवर परवाना व अग्निशमन विभागामार्फत संयुक्त कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes