SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहराच्या आरोग्य सुविधांना मिळणार नवी दिशा: महानगरपालिका आरोग्य समितीच्या पहिल्याच बैठकीत महत्त्वाचे निर्णयवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या मनगटावर लाडक्या भगिनींच्या प्रेमाची राखी; "माता-भगिनींचे आशीर्वाद हेच माझे खरे सुरक्षा कवच" - हसन मुश्रीफपहिल्या महायुद्धादरम्यान इटली आणि जर्मनीचा संघर्षभागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागागोकुळ निवडणुकीत शेतकरी पॅनेलची मोर्चेबांधणी; २५ जागा स्वबळावर लढवण्याची भूमिका : आमदार सतेज पाटीलप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची राष्ट्रभक्तीपर समूहगान स्पर्धेत हॅटट्रिक!कोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीच्या बाल्कनीचा गिलावा पडला ; सुरक्षिततेसाठी सेफ्टीनेट लावणारकोल्हापूर महापालिकेच्यावतीने निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी कालबध कार्यक्रम निश्चितमहिलांना संधी, हक्क आणि सुरक्षिततेची जाणीव करून देण्यावर भर: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधवभाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश; पंचगंगा स्मशानभूमीतील दोन्ही धोकादायक कमानी उतरविल्या

जाहिरात

 

कोल्हापूर शहराच्या आरोग्य सुविधांना मिळणार नवी दिशा: महानगरपालिका आरोग्य समितीच्या पहिल्याच बैठकीत महत्त्वाचे निर्णय

schedule28 Aug 26 person by visibility 147 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरातील डेंग्यू, रेबीज, कचरा उठाव, स्वच्छता आणि आरोग्य केंद्रांच्या खालावलेल्या सद्यस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य समितीची पहिली सभा आज स्थायी समिती सभागृहात पार पडली. आरोग्य समिती सभापती  सुरेखा ओटवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील सर्व दवाखान्यांच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला.

​ उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून शहरातील सर्व दवाखान्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे निधीअंतर्गत प्राप्त निधी व नियोजित कामांची माहिती सादर केली.

​ उपसभापती वैभव माने यांनी सावित्रीबाई फुले व पंचगंगा रुग्णालयातील वॉर्ड बॉय, आया कम स्विपर आणि ड्रेसर यांसारख्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला. तसेच आरोग्य केंद्रांच्या इमारतींची डागडुजी व सुलभ शौचालयांबाबत प्रश्न मांडले.
​वैद्यकीय अधिकारी भरती: सदस्या सौ. स्वाती येवलूजे यांनी शहरातील फिजिओथेरपी सेंटरमधील वैद्यकीय अधिकारीपदाची भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

​आरोग्य सुविधांना प्राधान्य: शहरातील सर्व आरोग्य समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सभापती  सुरेखा ओटवकर यांनी दिले.

​या बैठकीस आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, अधीक्षक सागर कांबळे, रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes