शक्तिपीठ महामार्ग अलाइनमेंट बदल नको संपूर्ण महामार्ग रद्द करा; आजरा येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या मेळाव्यात निर्धार
schedule15 Apr 26 person by visibility 135 categoryराज्य
कोल्हापूर : गरज नसलेला शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे त्यासाठी आमचा लढा कायम राहील असा निर्धार आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय .आजऱ्यातील शिवाजी सावंत सभागृहात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं संभावित नवीन अलाइनमेंट मधील गावातल्या शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.माजी खासदार राजू शेट्टी यांनी " या महामार्गामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला.
यावेळी गट नंबर आल्यानंतर जिल्हा आणि तालुकावार मेळावे घेत हळूहळू आंदोलन न थकता तीव्र करण्याचा ठराव सर्व संमत करण्यात आला.
आजऱ्यातील शिवाजी सावंत सभागृहात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं संभावित नवीन अलाइनमेंट मधील गावातल्या शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार राजेश पाटील, महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, संपत देसाई, सुधीर देसाई, सुनील शिंत्रे , तानाजी देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी , गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग हा संपूर्ण रद्द व्हायला हवा असं सांगितलं. शेतकऱ्यांचा संघटित दोन वर्षे विरोध असल्यानं या महामार्गाची अलाइनमेंट बदललीय . सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत नाही. पण कोल्हापुरातील शेतकरी जिद्दीला पेटलाय . दुसऱ्या अलाइनमेंट विरोधात देखील हळूहळू आंदोलनाची व्याप्ती वाढवत मेळावे घेऊन संघर्ष उभारू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.. शक्तिपीठ महामार्ग विरोधातल्या आंदोलनाचं मुख्य केंद्र हे कोल्हापूर राहील ... पैशाच्या आमिषाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये... शेतकऱ्यांना शक्तिपीठाच्या महामार्गासाठी जमीन देण्याकरिता एजंट नेमणूक करण्यात आलीय.... टक्केवारी वर गावागावात माणसं नेमली गेली आहेत, 1000 पोरांची टीम तयार केलीय त्या माध्यमातून शेतकऱ्यांना शक्तीपीठ रस्त्यासाठी जागा देण्याकरिता तयार केलं जातंय ,त्याला शेतकऱ्यांनी फसून जाऊ नये.... गरज नसलेला शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे त्यासाठी आमचा लढा कायम राहील असा निर्धार आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी " या महामार्गामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला.. मूठभर ठेकेदारांना आणि समर्थन करणाऱ्या सरकारमधील आमदारांना फायदा करून देण्यासाठी हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारला जातोय . शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचं सरकारनं सिद्ध करून दाखवावं...असं आव्हान शेट्टी यांनी दिलं .
माजी आमदार राजेश पाटील यांनी चंदगड मध्ये जैवविविधता, पर्यावरण यांना हानी पोहोचून जंगली प्राणी शेतकऱ्यांच्या शिवारात आणि घरात शिरतील अशी भीती व्यक्त केली .या महामार्गाचा अट्टाहास हे स्थानिक आमदाराचे अज्ञान दर्शवतं अशी टीकाही त्यांनी केली..
गिरीश फोंडे यांनी भोंदू बाबा अशोक खरात यानं शक्तिपीठ महामार्गात जमीन खरेदी केली असल्याचं सांगून याची चौकशी करण्याची मागणी केली.. या महामार्गामध्ये कंत्राटदारांचे हितसंबंध असून सरकार कंत्राटदारांसाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप फोंडे यांनी केला..
संपत देसाई यांनी आपल्या भाषणात या महामार्गामुळे पर्यावरण तर धोक्यात येईलच पण स्थानिक लोक संस्कृती लयास जाईल अशी भीती व्यक्त केली.. या अगोदरच्या प्रकल्पात विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झालेलं नाही. त्यातच शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा विस्थापित होण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक ,जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई ,तानाजी देसाई, सुनील शिंत्रे, संजय तरडीकर, राजेंद्र गड्ड्यांवर, युवराज जाधव, मुकुंद देसाई, सम्राट मोरे, यांचीही भाषणं झाली.
यावेळी गट नंबर आल्यानंतर जिल्हा आणि तालुकावार मेळावे घेत हळूहळू आंदोलन न थकता तीव्र करण्याचा ठराव सर्व संमत करण्यात आला.
यावेळी गोकुळ संचालक प्रकाश पाटील, अरविंद देसाई, संदीप देसाई ,अंजनाताई रेडेकर, अभिषेक शिंपी, रवींद्र बाटले, प्रकाश मोरुजकर ,कृष्णा भारतीय ,निवृत्ती कांबळे,, अभिजीत शिंपी, संजय सावंत, अशोक तरडेकर, संजय तरडेकर, सचिन घोरपडे, सर्जेराव देसाई, तानाजी देसाई यांची उपस्थिती होती.