गडहिंग्लज तालुक्यातील मौजे नांगनूर इथे अंगणवाडीच्या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन
schedule15 Apr 26 person by visibility 70 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेतून गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडीसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला. आज खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधताना, ग्रामीण भागातील शैक्षणिक पाया मजबूत करण्याला खासदार महाडिक यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून, गडहिंग्लज तालुक्यातील मौजे नांगनूर इथल्या अंगणवाडी क्र. २५८ साठी, विशेष निधी मंजूर झाला होता. या निधीतून अत्यंत देखणी आणि सर्वसुविधायुक्त अंगणवाडी इमारत साकारली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन झाले. मुलांच्या शैक्षणिक कारकिर्दीची आणि उज्ज्वल भविष्याची खरी सुरुवात अंगणवाडीतूनच होत असते. दर्जेदार प्राथमिक शिक्षण आणि उत्तम सोयीसुविधा मिळाल्यास, ग्रामीण भागातील मुले अनेक क्षेत्रात चमकत आहेत. अंगणवाडीच्या सुसज्ज इमारतीमुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
यावेळी सातापा तेरदाळे, चंद्रशेखर पाटील, राजन दड्डीकर, सरपंच सुप्रिया कांबळे, बाळासाहेब मोकाशी, नामदेव मोकाशी, अरुण मोकाशी, गिरीश पाटील, प्रमोद आळवेकर, विकास मोकाशी, बाळ पोटे, राजशेखर पाटील, सचिन घुगरे, सागर गंधवाले यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.