SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाजागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती व दंडात्मक मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसादसायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात राबविणार पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रमआयुक्त डॉ. राजेंद्र भारुड विविध विभागांचा घेतला आढावाशिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पणडी. वाय. पाटील अभियांत्रिकी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना १२५ हून अधिक जॉब ऑफर्सकोल्हापूर पोलिसांचा दणका: घरफोडीचा मास्टरमाइंड टोळीसह जेरबंद, तब्बल १२.४६ लाखांचा ऐवज जप्त!कोल्हापूर पोलीस दलाची मोठी कामगिरी: पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेत वेग आणि आधुनिकीकरणजागतिक महासागर दिन: पृथ्वीच्या निळ्या हृदयाचे जतन ‘स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणेसाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणार

जाहिरात

 

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती व दंडात्मक मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

schedule08 Jun 26 person by visibility 99 categoryसामाजिक

  कोल्हापूर : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर विविध जनजागृतीपर व दंडात्मक उपक्रम राबविण्यात आले. सामान्य रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

  या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण, पालक व शिक्षकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करणारा संदेश दिला.कोल्हापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या उद्देशाने महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते तंबाखूमुक्त व थुंकीमुक्त कोल्हापूर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

  गडहिंग्लज पंचायत समिती कार्यालय तसेच शाहूपुरी व गांधीनगर पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष मौखिक आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे पोस्टर स्पर्धा, पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथे जनजागृती रॅली, तर शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील आरोग्य संस्थांमध्ये रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा व तंबाखूमुक्तीची शपथ कार्यक्रम घेण्यात आले.

  जनजागृतीबरोबरच कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात संयुक्त पथकाने कठोर कारवाई केली. मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्थानक, शाळा व महाविद्यालय परिसरात तपासणी मोहीम राबवून 2 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच गांधीनगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व धूम्रपान करणाऱ्यांविरोधात कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 7 हजार 600 रुपयांचा दंड आकारण्यात आला. कोल्हापूर जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी, या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes