अयोध्येत विक्रमी २९ लाख दिव्यांचा दीपोत्सव!
schedule20 Oct 25 person by visibility 79 categoryदेश

नवी दिल्ली : प्रभू रामचंद्र यांचे जन्मस्थान असलेली अयोध्या नगरी दिवाळीनिमित्त २९ लाख दिव्यांनी झळाळून निघाली. 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये ही विक्रमी आरासची नोंद झाली आहे. जगभरातून लोक हा 'दीपोत्सव' पाहण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येतील दीपोत्सवासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
५६ घाटांवर २६.११ लाख दिवे प्रारंभी 'राम की पैडी' येथील प्रज्वलित करण्यात आले. तसेच अन्यत्रही दिव्यांची आरास शरयू तीरावर करण्यात आली होती. एकूण २९ लाख दिव्यांनी अयोध्या नगरी झळाळून गेली होती.
'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'चे स्वप्निल दंगारीकर व सल्लागार निश्चल बारोट यांनी ड्रोनच्या सहाय्याने या दिव्यांची गणना केल्यानंतर विश्वविक्रमाची घोषणा केली. जागतिक विक्रम सलग नवव्यांदा हा बनला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रभारी मंत्री सूर्य प्रताप शाही व अन्य या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार बनले. तसेच शरयू नदीवर झालेल्या आरतीत २,१०० वेदाचार्य सहभागी झाले होते. या विक्रमाचीही नोंद 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये झाली. अयोध्येतील अद्भुत दीपोत्सव पाहायला देशाच्या विविध भागातून लाखो भाविक शहरात आले आहेत. दीपोत्सवानंतर भव्य आतषबाजी व ड्रोन शो पार पडला.