कोल्हापूर : मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी भारतीयांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम, माता सीता, अक्कलकोटचे श्रध्दास्थान स्वामी समर्थ यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजकर तिकटी याठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शरद पवार व ज्ञानेश महाराव यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. महेश जाधव म्हणाले, प्रभू श्रीराम हाच आमचा हिंदू धर्म आणि त्यांचे चरित्र हीच आमची संस्कृती असताना स्वत:ला जाणता राजा समजणाऱ्या शरद पवार व कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीतच या ज्ञानेश महाराव सारख्या एका शूल्लक व्यक्तीने प्रभू श्री रामावर व स्वामी समर्थांवर टिका करावी हे शरद पावारांच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही. शरद पवारांचा राजकीय अजेंडा नेहमी हिंदू धर्मावर टीका करणे जाती-जातीमध्ये फुट पाडून राजकारण करणे या वरच चालतो. अन्य धर्मावर काही बोलण्याची हिंमत यांच्यामध्ये नाही. भारतीय राज्य घटनेनुसार कोणासही कोणत्याही धर्म संस्कृतीवर विरोधात बोलण्याचा अथवा टीका करण्याचा अधिकार नाही असे केल्यास तो गंभीर गुन्हा असून त्यास अटक केली जाते. त्यामुळे ज्ञानेश महाराव यास तत्काल अटक करण्यात यावी.
विजय जाधव म्हणाले, हिंदू धर्मियांच्या सहिष्णू वृत्तीचा अंत पाहणारे वक्तव्य सातत्याने ज्ञानेश महाराव यांच्या वतीने केले जाते. धर्म व संस्कृतीवर अत्यंत खालच्या पातळीवर सातत्याने हल्ला केला जातो. हिंदू सहन करतात याचा अर्थ ते प्रत्येक वेळी शांत राहतील असे नाही इथून पुढे असा नीचपणा खपून घेतला जाणार नाही. यामागचा बोलविता धनी कोण ? याचा शोध घेण्याची गरज आहे. शरद पवारांची या वक्तव्यास सहमती आहे ? त्यांनी त्याचा तेथेच विरोध करावयास हवा होता. पण आता इथून पुढे जश्यास तसे या न्यायाने अश्या वृतींना कोल्हापूरी स्टाईलने योग्य ते उत्तर दिले जाईल.
हेमंत आराध्ये म्हणाले शरद पवारांचे राजकारणच मुळात हिंदू धर्मावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम आहे. आयुष्यभर इतर धर्मियांचे लांगूल चालन करणे व जाती जाती मध्ये फुट पाडणे, जाणीव पूर्वक हिंदू धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर आघात करणे व चोरून स्वत: मात्र देव देव करणे ही यांची नीती आहे. आता हिंदू धर्मीय हे खपवुन घेणार नाहीत.
सदर आंदोलन अध्यक्ष विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र शब्दात निषेध करणाऱ्या फलकांसह भा ज पा अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संजय जासूद, सरचिटणीस डॉ .राजवर्धन, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीश साळोखे , अनु.जाती मोर्चा अध्यक्ष अनिल कामत यांच्या वतीने घेण्यात आले.
यावेळी विराज चिखलीकर, आशिष कपडेकर , भरत काळे, सतीश आंबर्डेकर, बाबा पार्टे ,सचिन सुतार ,सुधीर बोलवे, दिलीप बोंद्रे, सुशीला पाटील ,डॉ.आनंद गुरव, दत्तात्रय मेडशिंगे , सुधीर देसाई , राजू पवार, धीरज पाटील, अमित कांबळे व कार्यकर्ते, पदाधिकारी समस्त हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.