SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ड्रग्जचा प्रादुर्भाव हा 'नार्को-टेररिझम'चा भाग; भाजयुमोची पोलिसांच्या सहकार्याने राज्यव्यापी मोहिमेची मागणी!कोल्हापूर आय.टी. पार्कचा ताबा एमआयडीसीकडे सुपूर्तऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​पाणी जपून वापरा! काळम्मावाडी सबस्टेशनच्या कामामुळे कोल्हापूरचा पाणीपुरवठा विस्कळीतदुचाकीसाठी नवी नोंदणी मालिका 3 जूनपासूनस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाईइंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभकोलोली येथील महिला खुनाचा गूढ उकलला; अतिप्रसंगाला प्रतिकार केल्यानेच केली होती हत्या, स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक!करवीर तालुक्यात संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची पेन्शन रखडली; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तहसीलदारांना निवेदनराष्ट्रवादीतील ‘पेल्यातील वादळ’ पेल्यातच शमले; 'गोकुळ' आणि साखर कारखानदारीच्या प्रश्नांवर मंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य!

जाहिरात

 

ड्रग्जचा प्रादुर्भाव हा 'नार्को-टेररिझम'चा भाग; भाजयुमोची पोलिसांच्या सहकार्याने राज्यव्यापी मोहिमेची मागणी!

schedule27 May 26 person by visibility 101 categoryसामाजिक

कोल्हापूर  : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष  कृष्णराज महाडिक यांनी आज महाराष्ट्राचे माननीय पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत महाराष्ट्रातील महाविद्यालयीन तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण निवेदन दिले.

सध्या राज्यातील प्रमुख शैक्षणिक शहरांमध्ये विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आदी ठिकाणी ‘एम.डी.’ व इतर सिंथेटिक ड्रग्जचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक असून हा विषय केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून ‘नार्को-टेररिझम’शी संबंधित गंभीर राष्ट्रीय सुरक्षा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाने महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने राज्यव्यापी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.

▪️निवेदनामध्ये पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या :
• महाविद्यालयीन मोहिमेसाठी अँटी-नारकोटिक्स विभागाकडून विशेष नोडल ऑफिसर नियुक्त करणे.
• प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी कॅम्पस अ‍ॅम्बेसेडर’ नियुक्त करण्यास परवानगी देणे.
• विद्यार्थिनींसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने आत्मरक्षण प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे.
• ‘ड्रग्ज आणि नार्को-टेररिझम’ विषयावर कॉलेज कॅम्पसमध्ये जनजागृती सत्रे घेणे.
• पालकांसाठी विशेष मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन करणे.
• युवकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा व क्रीडा संस्कृतीला चालना देणे.

यावेळी  पोलीस महासंचालक  सदानंद दाते यांनी निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत विषय गांभीर्याने विचारात घेण्याचे आश्वासन दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes