SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशिराळा तालुक्यातील करुंगली-गुंडगेवाडी येथील गावपुल कोसळला; वाहतूकीस बंदराज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू : मंत्री मंगल प्रभात लोढावीरपत्नीला मिळाला मायेचा आधार; लागेल तेवढे सिमेंट मोफत मिळाल्याने उभारले स्वप्नातील घरप्रा. राजमल जैन यांचे "भारत आणि अवकाश" या विषयावर अत्यंत प्रेरणादायी व्याख्यानमाजी सैनिकांनी 5 ऑगस्ट पर्यंत तक्रारी, अडचणी सादर कराकोल्हापूर व इचलकरंजी पोस्ट ऑफीसमधील सार्वजनिक व्यवहार 2 ऑगस्ट रोजी राहणार बंदडी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर परीक्षेत यशकागल येथे प्रवीण काळबर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी खुली व 15 वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा रशियाला ८.७ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का, जपान आणि अमेरिकेतही त्याचा परिणाम; त्सुनामीचा इशारा

जाहिरात

 

"बाजी"

schedule15 Jun 25 person by visibility 546 categoryसंपादकीय

आज 'फादर डे' च्या निमित्ताने आणि पहिल्यांदाच मी माझ्या वडिलांबद्दल व्यक्त होत आहे. आज निमित्त काही असले तरी मनामध्ये वडिलांबद्दल असलेले प्रेम, आदरभाव सदैव  राहिलेला आहे. पण व्यक्त होण्याची ही पहिलेच वेळ,  माझे वडील कुटुंबवत्सल त्यांची प्रेरणा  माझ्यासाठी  जीवनाकडे बघण्याचा सकारात्म दृष्टिकोन देणारी ठरली आहे. अर्थात माझे वडील अन्वरखान उस्मानखान पठाण त्यांना आम्ही 'बाजी' म्हणत असे,  घरातील सदस्यांसाठी ते बाजी होत.

 'बाजी' विषयी सांगायचे तर माझे आजोबा उस्मानखान रसूलखान पठाण व आजी जन्नतबी उस्मानखान पठाण यांचे ते चौथे अपत्य होय. बाजी यांचा जन्म कोल्हापुरामध्ये २७ डिसेंबर १९४३ रोजी झाला. घराच्या हालाखीचा परिस्थिती त्यांचे आठवीपर्यंत शिक्षण झाले. बाजीचा विवाह  भुदरगड तालुक्यातील कडगाव येथील शमशादबी शेख यांच्याशी २४ डिसेंबर १९७० या रोजी झाला. 

 आजोबा महानगरपालिकेमध्ये जकात नोकरीस होते पुढे आजोबांची नोकरी वारसा हक्काने  वडिलांना मिळाली . नोकरी करत असताना त्यांनी आठवीच्या पुढील शिक्षण साठी कॉमर्स कॉलेजच्या नाईट हायस्कूल मध्ये प्रवेश मिळाला. मात्र घरच्या जबाबदारी यातून शिक्षण पूर्ण करता आले नाही. पण शिक्षणाबद्दल असणारी तळमळ नेहमीच दिसून आली. आई- वडील दोघांचेही शिक्षण जेमतेम पण आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे यासाठी विशेष लक्ष  दिले.  

  त्यांना मी मेहबूबखान द्वितीय मुलगी हमीदा आणि लहान भाऊ जहाॅखान ही तीन अपत्य वडिलांनी शिक्षणात महत्त्व दिल्याने लहान भाऊ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर मी बीजेसीची पदवी घेऊन पत्रकार बनलो बहिणीचे  दहावीपर्यंत व धार्मिक शिक्षण घेतले.  आम्ही शिक्षण घेत असताना कोणतीच अतिरिक्त जबाबदारी दिली नाही अभ्यास करा मोठे व्हा मंत्र दिला.  शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही नोकरी पत्करली पण तोपर्यंत बाजी आहेत ना भावना मनात होती व ती शेवटपर्यंत राहिली. बाजीनी आम्हा भावंडांची लग्ने थाटामाटात करून दिली.

मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे निर्व्यसनी राहावे ही त्यांची भूमिका यासाठी स्वतः बाजी तंबाखू खात मात्र एक तंबाखूची पुडी त्यांना 15 दिवस चालत असेल इतके त्यांचे तंबाखू खाण्याचे प्रमाण कमी होते.  आपल्या मुलांच्या समोर ते कधी तंबाखू खात नसत आपली मुले व्यसनापासून दूर राहावे ही त्यांची तळमळ त्यामुळे आम्ही दोघे भाऊ कोणत्याही व्यसनापासून  दूर आहोत. हे सर्व घरातून मिळालेले संस्कारच म्हणावे लागतील.

 बाजी महानगरपालिकेत प्रथम शिपाई म्हणून रुजू झाले. आरोग्य विभाग मुकादम, सहाय्यक सॅनिटरी इन्स्पेक्टर अशी त्यांना बढती मिळाली.  त्यांना ऑफिसच्या गणवेशाचा मोठा अभिमान होता. ते कामावर असताना कायम खाकी गणवेशांमध्ये दिसत क्वचितच ते सिव्हिल ड्रेस वापरत. आरोग्य विभागात मुकादम म्हणून काम करताना बाजींचा दरारा काही औरच होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये  वचक  होता.  कर्मचाऱ्याकडून आपुलकीने काम करून घेण्याची पद्धत ही वाखाळण्याजोगी होती.  यामुळे जेथे समस्या तेथे पठाण साहेब हे समीकरण  दिसून येत असे.  कधी त्यांनी कर्मचाऱ्याकडून चहा घेतला नाही.  आज त्यांच्याबरोबर काम केलेले काही कर्मचारी मला भेटतात त्यांच्याबद्दल सांगत असतात त्यांच्याकडून सांगितलेला किस्सा आज येथे सांगावासा वाटतो.  मुकादम असल्याने  पहाटे सकाळी कामावर जात त्यांना चहाची तलप आल्यामुळे चहा घेण्यासाठी त्यांच्याकडे असणाऱ्या पैशांमध्ये 50 पैसे कमी होते त्यांनी त्या मार्गावर जाणाऱ्या आरोग्य विभागाच्या वाहनास थांबून चालकाकडून   50 पैसे उसने घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच ठिकाणी त्या आरोग्य विभागाच्या वाहनास थांबून चालकाकडून उसने घेतलेले 50 पैसे परत केले  अशा अनेक प्रसंगाच्या आठवणी  लोकांच्या मनामध्ये आहेत आज ते लोक बोलूनही दाखवतात. अशा घटना ऐकल्यानंतर ऊर भरून येतो. बाजीच्या कामांमध्ये प्रेम आपुलकी दिसून येते  कामांमध्ये वक्तशीरपणा नेटकेपणा प्रामाणिकपणा आणि समोरच्या व्यक्तीला आदर देत करतो साहेब ही काम करण्याची दिलेली हमी यामुळे आजही ते स्मरणात आहेत त्यांना परिचित असलेल्या लोक आजही त्यांचे साधा माणूस सरळमार्गी माणूस म्हणून स्मरण करतात.

 सेवानिवृत्त झाल्यानंतर घरासमोर दुकान गाळ्यामध्ये बेकरी सुरू केली येथे दहा वर्षे त्यांनी आपले योगदान दिले. त्याचबरोबर धार्मिक कार्यात सहभाग नमाज पठाण त्यांनी श्रद्धेने केले .


 आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत माझे बाजी आपल्या परिवारासाठी  चंदनासारखे झिजले.   कारण ते कुटुंबवत्सल होते  त्यांचा मृत्यू  ८ एप्रिल २०१२  रोजी झाला  पण आजही त्यांची शिकवण,  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर  घडलेल्या घटना मनाला दिलासा देऊन जातात जगण्याचा मूलमंत्र   समजवतात यामुळे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते मार्गदर्शक ठरतात आयुष्यात प्रथम माझ्या बाजी विषयी व्यक्त होताना ऊर भरून आला लिहीताना आयुष्यातील प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर येऊन गेला पण तूर्तास इतकेच...

✍️ एम. . पठाण
संपादक, एसएमपी न्यूज नेटवर्क

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes