SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग...“देशाच्या जनसांख्यिकीय लाभांशाची पोषकता वाढविण्यासाठी प्रगत अनुदेशन पद्धतीद्वारे कौशल्य निर्मितीची गरज” : प्रा.डॉ.किरणकुमार शर्माशिवाजी विद्यापीठात संत रविदास महाराज जयंतीजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : भुदरगड भरारी पथकाची धडक कारवाई; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त; उमेदवारावर आचारसंहिता भंग गुन्हा दाखलरांगोळी येथील संवेदनशील खुनाचा गुन्हा उघड, तीन आरोपी अटक.समूहभावाचे खेड्याचे जीवनतत्व भंगल्यानेच सामाजिक प्रश्र्न वाढले : ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महानगरपालिका : महापौर पद व इतर सर्व पद विभागणीबाबत निर्णय उद्या; महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठकलढणार्‍यांना पाठबळ द्या : रमेश गावस; विद्यापीठात पर्यावरण आणि प्रसारमाध्यमे विषयावर कार्यशाळा

जाहिरात

 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : भुदरगड भरारी पथकाची धडक कारवाई; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त; उमेदवारावर आचारसंहिता भंग गुन्हा दाखल

schedule01 Feb 26 person by visibility 179 categoryगुन्हे

गारगोटी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असताना भुदरगड तालुक्यातील भरारी पथकाकडून तब्बल 14 लाख 62 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉ. युवराज येडुरे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला  आहे.

डॉ. युवराज येडुरे हे भुदरगड तालुक्यातील कुर पंचायत समिती गणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आहेत. त्यांच्यामार्फत कागल तालुक्यातील बोरवडे येथे कृषी साहित्य मिळण्यासाठी फॉर्म भरून घेत असल्याची व साहित्य वाटप होणार असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती. भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना याबाबत बोरवडे येथे बोलवण्यात आले होते. शनिवार, 31 जानेवारी रोजी सकाळपासून फॉर्म भरून घेण्याची कार्यवाही व दुपारी साहित्य वाटप होणार असल्याची खात्री भरारी पथकाने केल्यानंतर पोलीस विभागाच्या उपस्थितीत दुपारी धाड टाकण्यात आली.

▪️14 लाखाचा मुद्देमाल जप्त
भरारी पथकाला कारवाईच्या वेळी शेतीला तणनाशक/औषध फवारणीसाठी वापरण्यात येणारे 504 पंप आढळून आले. या साहित्याची अंदाजे किंमत 14 लाख 62 हजार आहे. हे साहित्य कार्पोरेट सामाजिक जबादारी (CSR) मधून मिळाल्याचे व अशासकीय संस्थेद्वारे (NGO) वाटप करत असल्याचे डॉ. येडुरे यांच्याकडून सांगण्यात आले. तथापि आचारसंहिता काळात उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधीकडून मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणतीही कृती किंवा साहित्य वाटप करण्यास प्रतिबंध असल्यामुळे भरारी पथकाने सर्व साहित्य जप्त केले व मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये डॉ. युवराज येडुरे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा शनिवारी रात्री उशिरा नोंदवण्यात आला.

▪️साहित्य वाटप केल्याचे निष्पन्न
 शनिवारी दुपारपासून कृषी पंपाचे वाटप केल्याचे व्हिडीओ भरारी पथकाला मिळाले आहेत. तसेच मुदाळ तिट्टा येथील निवडणूक विभागाने स्थिर सर्वेक्षण पथकात लावलेल्या सी सी टीव्ही कॅमेऱ्यात विविध गावातील शेतकरी कृषी पंप घेऊन जात असल्याचे आढळून आले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमांतर्गत नेमण्यात आलेल्या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून मुरगूड पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा भुदरगड-आजरा उपविभागाचे प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes