मुंबई : काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे . या बंडखोरीनंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून बाजीराव खाडे यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत दिले आहेत.
कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच माघारी न घेता ते रिंगणात कायम राहिले आहेत
सामान्य कार्यकर्त्यांनी किती दिवस काम करत राहायचे. पक्षातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरलो असल्याचे बाजीराव खाडे यांनी म्हटले होते. आता या बंडखोरीची पश्रश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून खाडे यांचे ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.