घरफाळा थकबाकीपोटी मनीषा नगर येथील बारबेल्स जीम ऍ़न्ड फिटनेस सेंटर सील
schedule27 Feb 26 person by visibility 106 categoryराज्य
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने शहरातील ज्या मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही अशा थकबाकीदारांच्या मिळकतीवर कारवाई करण्यास महानगरपालिकेने सुरु केले आहे. त्यानुसार आज घरफाळा विभागीय कार्यालय क्र1 गांधी मैदान अंतर्गत बी वॉर्ड मनीष नगर परिसरातील यशवंत गोपाळ कांबळे यांचे बारबेल्स जीम ऍ़न्ड फिटनेस सेंटरची रक्कम रु. 12 लाख 23 हजार 192 थकबाकी असल्याने आज सीलची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई आयुक्त के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घरफाळा विभागाने केली आहे.
तरी शहरातील सर्व थकबाकीदारांना पुन:श्च जाहीर आवाहन करणेत येते की, ज्यांनी अद्यापही आपल्या घरफाळ्याची थकीत रक्कम भरणा केलेली नाही त्यांनी आपला थकीत घरफाळा लवकरात लवकर भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे.
अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधीत मिळकत सील किंवा मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल.