SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गडहिंग्लज तालुक्यातील मौजे नांगनूर इथे अंगणवाडीच्या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटनभारतीय वायुदलामध्ये अभियंत्यांना मोठ्या संधी; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायुदल अधिकाऱ्यांकडून 'करिअर मार्गदर्शन'; हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवले वायुदलाचे अंतरंगशक्तिपीठ महामार्ग अलाइनमेंट बदल नको संपूर्ण महामार्ग रद्द करा; आजरा येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या मेळाव्यात निर्धारअण्णासाहेब पाटील महामंडळाची वैयक्तिक व गट कर्ज सुलभ परतावा योजनाडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कौशल्य विकास विभागाकडून निबंध स्पर्धेचे आयोजनकोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर बसस्थानकासह ४ बसस्थानकांचे होणार उद्घाटन; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कोल्हापूर दौराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेट देवून खासदार महाडिक यांनी साधला संवादटायटॅनिक: एका भव्य स्वप्नाचा महासागरातील अंतमुंबईतील 12 अग्निशमन अधिकारी,जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान; राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटनसैनिकांच्या गावाला विकासनिधी कमी पडू दिला जाणार नाही : आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर

जाहिरात

 

डॉ. डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक

schedule27 Feb 26 person by visibility 367 categoryक्रीडा

कसबा बावडा : येथील डॉ डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकच्या मुलांच्या संघाने पदविका विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. सावंतवाडी येथे झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यातील अकरा संघ  सहभागी झाले होते.
या विजयी संघात अथर्व शिंदे ,हेत छाभैय्या ,तनिष्क यादव ,मितेश पटेल ,मेहुल पटेल यांचा समावेश आहे.

डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते आणि विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के.गुप्ता, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी , रजिस्ट्रार महेश रेणके जिमखाना विभागप्रमुख अक्षय करपे,  प्रा. सुरज जाधव यांच्या उपस्थितीत या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

इंटर इंजिनीरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत या स्पर्धा झाल्या. डॉ डी. वाय. पाटील पॉलीटेक्निक संघाने शरद पॉलीटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक रत्नागिरी आणि अंतिम सामन्यात  संजय घोडावत पॉलीटेक्निक या संघावर विजय मिळवले. विजेता डी. वाय.पाटील संघ संजीवनी केबीपी पॉलीटेक्निक कोपरगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes