आयोध्या डेव्हलपर्स यांच्यामार्फत छ.ताराराणी चौक येथे फूटपाथचे सुशोभीकरण
schedule28 Mar 25 person by visibility 298 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : छत्रपती ताराराणी चौक येथे आयोध्या डेव्हलपर्स यांच्यामार्फत सी.एस.आर. फंडातून साधारणपणे 48mx5m च्या फूटपाथच्या सुशोभीकरणाचे काम केले आहे. या फुटपाथाचे लोकार्पण आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वच्छ शहर अभियानाचा भाग म्हणून अयोध्या डेव्हलपर्स यांनी साधारणपणे 7 ते 8 लाख रुपये खर्च करुन छ.ताराराणी चौकातील शहराच्या प्रवेशाच्या बाजूने फुटपाथ सुशोभीकरण केले आहे.
यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे, आयोध्या डेव्हलपर्सचे व्ही बी पाटील, प्रकाश देवलापूरकर, शाखा अभियंता मीरा नागिमे, कनिष्ठ अभियंता अवधूत नेर्लेकर, उमेश बागुल व नागरिक उपस्थित होते.