गेल्या ५ वर्षांच्या काटकसरी कारभारावर ठरावधारकांचा विश्वास : आमदार सतेज पाटील
schedule29 Sep 26 person by visibility 171 categoryराज्य
◼️सरूडकर गटाच्या २५३ ठरावधारकांचा भक्कम पाठिंबा
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा हा जिल्हा स्वाभिमानी असल्याची ओळख आहे. साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकरी नेहमीच तत्त्वं आणि स्वाभिमान जपणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभा राहतील. दूध उत्पादक शेतकरी हाच आमचा केंद्रबिंदू' मानून आम्ही गेल्या पाच वर्षांत अत्यंत काटकसरीने आणि पारदर्शक कारभार केला. याच पारदर्शकतेच्या जोरावर आज पुन्हा जिल्ह्यातील ठरावधारकांचा पाठिंबा समविचारी आघाडीला मिळत असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले ते शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथील मेळाव्यात बोलत होते.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचारार्थी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या यामध्ये माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर, जिल्हा परिषद सदस्य विजय बोरागे, अमरसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, सर्जेराव पाटील विलास पाटील, श्रीमती रत्नप्रभा पाटील भेडसगावकर, उदगीरी शाहूवाडी खरेदी विक्री संघाचे महादेव पाटील, शाहूवाडी चे माजी उपसभापती महादेव पाटील, उदय पाटील भेडसगावकर, डॉ मीरा पाटील भेडसगावकर, विजय पाटील भेडसगावकर, प्रमोद चौगुले, यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर प्राथमिक दूध संस्थांच्या ठरावधारकांचा भव्य मेळावा सरूड येथे पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर हे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी चे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून काटकसरीचा कारभार करत दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचे काम आम्ही केले आहे. पुढील काळात गोकुळला मिळालेल्या प्रत्येक १ रुपयामागे ९० पैसे थेट शेतकऱ्यांच्या पदरात पाडणार आहोत," असा ठाम विश्वास व्यक्त केला. दूध उत्पादक शेतकरी हाच आमचा केंद्रबिंदू असून एकात्मिक व एकमुखी नेतृत्वाला काम करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी ठरावधारकांना केले.
सध्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती अत्यंत गमतीशीर आणि सावळा गोंधळ निर्माण करणारी झाली आहे. 'लग्न ठरवायला मुंबईला गेले आणि मुख्यमंत्री नागपूरला गेले' अशी अवस्था विरोधकांची झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या या स्वाभिमानी कोल्हापूर जिल्ह्याने कधीही आपला स्वाभिमान गहाण ठेवला नाही. परंतु, आज काही लोक मुख्यमंत्र्यांच्या दारी जाऊन स्वाभिमान गहाण ठेवण्याचे काम करत आहेत. जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना हे अजिबात पटलेले नसून, सामान्य शेतकरी आमच्या आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास यावेळी आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
पन्हाळा - शाहूवाडी तालुक्यातील आम्ही पाटील बंधू एकत्र येऊन काम करणार आहोत. यामुळे पुढील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उभारी निर्माण होईल." सरूडकर गटाची २५३ ठरावधारकांची भक्कम साथ आमच्या समविचारी आघाडीला मिळाली असून या पाठिंब्यामुळे आघाडीचा विजय आता अधिक सोपा आणि सुकर झाला असल्याचे राजर्षी शाहू शेतकरी समविचार आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
माजी सत्यजीत पाटील सरूडकर यांनी सांगितले की, सहकार क्षेत्रात यापूर्वी कधीही पक्षीय राजकारण आले नव्हते. मात्र, आजच्या परिस्थितीमुळे 'शेण-काडी करणाऱ्या, दूध काढणाऱ्या सामान्य शेतकऱ्याचा गोकुळ राहिला आहे का?' असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधी नेत्यांना आपलेच ठरावधारक सांभाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत धाव घ्यावी लागत आहे, हाच त्यांचा ठरावधारकांवर अविश्वास असल्याचे स्पष्ट होते. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणे नसलेले जिल्ह्यातील सत्ताधारी नेते आज गोकुळच्या निवडणुकीत मुख्यमंत्री आणि संपूर्ण सरकारला उतरवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य महायुतीच्या हातात देणे धोकादायक आहे. साखर कारखाने, शिक्षण संस्था आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा विकास करून दाखवणारे आमदार सतेज पाटील हेच गोकुळला प्रगतीपथावर नेऊ शकतात. म्हणूनच गोकुळची एकमुखी सत्ता त्यांच्या हातात द्यावी," आम्ही पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील सामान्य जनतेसोबत सदैव ठामपणे उभे आहोत. बंटी साहेबांमुळे ज्यांना पदे मिळाली, तेच आज त्यांना सोडून गेले आहेत; परंतु तालुक्यातील जनता अशा लोकांना योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माजी आमदार सत्यजीत पाटील-सरूडकर यांनी केले.
जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील यांनी सांगितले की, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील ठरावधारकांचा कौल पूर्णपणे सतेज पाटील यांच्या बाजूने आहे. जिल्ह्यातील सर्व बडे नेते एका बाजूला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारे बंटी पाटील दुसऱ्या बाजूला अशी ही लढाई आहे. गेल्या पाच वर्षांत गोकुळच्या माध्यमातून घेतलेल्या शेतकरी हिताच्या निर्णयामुळे दूध उत्पादक पूर्णपणे समाधानी आहेत. त्यामुळे हा तालुका कायम साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
माजी संचालक रणजितसिंह पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर आणि बाबासाहेब देवकर यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या योगदानाचे स्मरण केले. "स्व. चुयेकर साहेबांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी गोकुळरुपी वटवृक्ष उभारला. त्यांचे शेतकरी हिताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि गोकुळचा कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी सतेज पाटील यांच्या हाती एकहाती सत्ता देणे गरजेचे आहे," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जि. प. गटनेते एकनाथ पाटील, रणजीत पाटील मुरगुडकर, शशिकांत पाटील- चुुयेकर, अभिजीत तायशेटे, रामराजे कुपेकर, हंबीरराव पाटील, नामदेव गिरी, भारत पाटील, जि. प. सदस्य अमर पाटील, वसंत पाटील, अभय चौगले, जालिंदर पाटील, दिलीप पाटील, युवराज पाटील, पांडुरंग पाटील, उदय खोत, विजय खोत, तानाजी चौगले, नामदेव पाटील- सावेकर, संजय मोरे, बाबा पाटील, बाबुराव पाटील, आबाजी पाटील, पी.एम. पाटील, आनंदराव पाचटक्के, विकास पाटील, बाबासाहेब चौगले, बाबासाहेब देवकर, श्रीमती अंजनाताई रेडेकर, बयाजी शेळके, सचिन घोरपडे, शशिकांत खोत, विद्याधर गुरबे, उदय पाटील- सडोलीकर, विश्वजीत जाधव, विश्वजीत रणजीत पाटील, विशाल पाटील, भीमगोंडा बोरगावे, भाग्यश्री डोंगळे, सत्यजित दिनकरराव जाधव, विश्वनाथ पाटील, रणधीर मोरे, विक्रम चव्हाण- पाटील यांच्यासह विविध दूध संस्थांचे सभासद, ठरावधारक, आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.