SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शनअसोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक 'मॅपकॉन' अधिवेशन कोल्हापुरातस्वाईन फ्ल्यूबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी : आरोग्य विभागाचे आवाहनसहकारमहर्षी शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिस अभिवादनहुपरी-कोल्हापूर मार्गावरील रखडलेल्या पुलाचे काम तात्काळ पूर्ण करा; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, अन्यथा रास्ता रोकोचा इशाराचैनीसाठी घरचाच घात! वडिलांच्याच घरातून लांबवले १० लाखांचे दागिने; करवीर पोलिसांकडून घरफोडीचा पर्दाफाश, चक्क 'मुलगाच' निघाला चोरकोरे अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागातील सात विद्यार्थ्यांची दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय कंपनीत कॅम्पस मुलाखती द्वारे निवडजागतिक हृदय दिन: आरोग्याची नवी दिशाकामगार क्रीडा भवनातील खेळाडू सोनम मस्करची आशियाई क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीमुदाळ तिट्टा येथे बस स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी महिला अटकेत; २१.१८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले जप्त

जाहिरात

 

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

schedule29 Sep 26 person by visibility 40 categoryराज्य

कोल्हापूर : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन वेदोक्त संकल्प पूजा केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर राज्यपाल श्री वर्मा यांनी मातुर्लिंग श्री महादेव व श्री गणेशाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. 

यानंतर पुरातत्व विभागाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरात सुरु असलेल्या जतन आणि संवर्धन कामाची पाहणी त्यांनी केली. याकामाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. राठोड व धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर यांनी माहिती दिली. 

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे , राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल, करवीर उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, तहसीलदार स्वप्नील पवार, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, व्यवस्थापक महादेव दिंडे, तसेच देवस्थानचे पुरोहित प्रमोद उपाध्ये, बाळासाहेब दादरणे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes