SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यात उष्णतेचा लाटेचा इशारा; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहनगडहिंग्लज तालुक्यातील मौजे नांगनूर इथे अंगणवाडीच्या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटनभारतीय वायुदलामध्ये अभियंत्यांना मोठ्या संधी; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायुदल अधिकाऱ्यांकडून 'करिअर मार्गदर्शन'; हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवले वायुदलाचे अंतरंगशक्तिपीठ महामार्ग अलाइनमेंट बदल नको संपूर्ण महामार्ग रद्द करा; आजरा येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या मेळाव्यात निर्धारअण्णासाहेब पाटील महामंडळाची वैयक्तिक व गट कर्ज सुलभ परतावा योजनाडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कौशल्य विकास विभागाकडून निबंध स्पर्धेचे आयोजनकोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर बसस्थानकासह ४ बसस्थानकांचे होणार उद्घाटन; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कोल्हापूर दौराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेट देवून खासदार महाडिक यांनी साधला संवादटायटॅनिक: एका भव्य स्वप्नाचा महासागरातील अंत

जाहिरात

 

भिमा कृषी प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्यावतीने मोफत झुणका-भाकरी वाटप

schedule14 Feb 26 person by visibility 438 categoryउद्योग

कोल्हापूर  : भिमा कृषी प्रदर्शनाला भेट देणार्‍या शेतकरी आणि नागरिकांसाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं मोफत झुणका भाकरीचं वाटप करण्यात आलं. जिल्हयाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या शेतकर्‍यांना प्रदर्शनात कृषी विषयक तंत्रज्ञान आणि नवनवीन माहिती तर मिळतेच. शिवाय शेतकर्‍यांना झुणका भाकरी मोफत मिळत असल्यानं, अनेकांनी समाधान व्यक्त केलं. सुमारे ५ हजार शेतकर्‍यांनी झुणका-भाकरीचा लाभ घेतला.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन म्हणून भिमा कृषी प्रदर्शनाकडं पाहिलं जातं. कृषी तंत्रज्ञान, नवनवीन औजारं, पशूपक्षी, जनावरं यामुळं हे प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरतंय. प्रदर्शन पाहण्यासाठी येणार्‍या शेतकरी आणि नागरिकांसाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं, प्रदर्शनकाळात दरवर्षी मोफत झुणका भाकरी वाटप करण्यात येतं.

आज दुपारी भुदरगड तालुक्यातील म्हसवे इथल्या नवज्योत महिला बचत गटाच्यावतीनं झुणका-भाकरीचं वाटप करण्यात आलं. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, मंगलताई महाडिक, शकुंतला महाडिक, साधना महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वाटप करण्यात आलं. त्याचा शेतकरी बांधव, विद्यार्थी आणि नागरिकांनी येथेच्छ आस्वाद घेतला. सुमारे ५ हजार शेतकर्‍यांनी झुणका भाकरीचा आस्वाद घेतला. जिल्हयाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या शेतकर्‍यांना प्रदर्शनात नवनवीन माहिती तर मिळतेच. शिवाय शेतकर्‍यांना झुणका भाकरी मोफत मिळत असल्यानं अनेकांनी समाधान व्यक्त केलं.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes