SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारमाही ऋतू हिरवा; भावभावनांचा सुरेल महासागर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजलीनियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण कामे करण्याची दक्षता घ्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकॉपीमुक्त अभियान विद्यार्थ्यांच्या सहभागातूनच यशस्वी होईल: दीपक अडगळेशिवाजी विद्यापीठाची स्वप्नाली मगदूम ‘यंग स्कॉलर’ स्पर्धेत देशात प्रथम; अमेरिकेतील परिषदेत करणार भारताचे प्रतिनिधित्वराजर्षी शाहू विकास आघाडीच्या यशाबद्दल लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा उत्साहात 'स्वप्नांच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच स्वप्न बना'; कोल्हापुरात कानिफनाथ महाराजांचे प्रेरणादायी विचारस्वरसम्राज्ञी आशा भोसले काळाच्या पडद्याआड; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासआमदार सतेज पाटील यांचा आज वाढदिवस; विविध उपक्रमाचे आयोजनअंतराळ संशोधनातील ऐतिहासिक भरारी: जागतिक मानव अंतराळ उड्डाण दिनक्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन

जाहिरात

 

राजर्षी शाहू विकास आघाडीच्या यशाबद्दल लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा उत्साहात

schedule12 Apr 26 person by visibility 169 categoryसामाजिक

शिरढोण : यड्रावकर प्रेमी व विकास कांबळे मित्र परिवार यांच्या वतीने राजर्षी शाहू विकास आघाडीला शिरोळ तालुक्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व नूतन लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नवनियुक्त सदस्यांना संबोधित करताना जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. लोकांनी दिलेल्या विश्वासाचे चीज करताना प्रत्येक निर्णय हा लोकहिताचा असावा, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजातील गरजू, वंचित घटकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचवणे ही प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. पद हे केवळ अधिकारासाठी नसून सेवा करण्याची मोठी संधी आहे. आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे, पारदर्शकता राखणे आणि लोकांशी सतत संवाद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार समाजकार्य करत राहावे, यामुळेच समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी समाजकल्याण समिती सभापती श्रद्धाताई गायकवाड, शिरोळ पंचायत समिती सभापती  मिलिंद कुरणे, जिल्हा परिषद सदस्य  अमोल चव्हाण,  प्रशांत शहापुरे,  कुमार कांबळे,  उत्तरादेवी शिंदे सरकार, प्राचिता कोळी तसेच पंचायत समिती सदस्य  प्रतिक उर्फ बंटी पाटील, नाना उपाध्ये, बाबासो वनकोरे, अविनाश पाटील,  दिप्ती जाधव,  सीमा म्हैशाळे, माजी जि.प. सदस्य  रंजना कोळी, दत्त कारखाना संचालक  रणजित कदम, नगरसेवक  जय कडाळे, सुनील पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, अविनाश गायकवाड, श्री. विजितबाबा शिंदे सरकार, चंद्रकांत कोळी, प्रशासक मिथुल जाधव, सरपंच सागर भंडारे, सुर्यकांत कोळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 प्रा. चंद्रकांत मोरे यांनी स्वागत केले. प्रस्ताविकामध्ये विकास कांबळे यांनी आघाडीच्या यशाचा आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी पंचायत समिती सभापती  मिलिंद कुरणे, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड तसेच बाबासो वनकोरे यांनी आपल्या मनोगतातून आघाडीच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार  माजी जिल्हा परिषद सदस्या रंजना कोळी यांनी केले. तर सुत्रसंचलन शशिकांत मुद्दापुरे यांनी केले. हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes