सामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
schedule13 Apr 26 person by visibility 90 categoryराज्य
कोल्हापूर : सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने सामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात 50 जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीरासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त 8 ते 14 एप्रिल या कालावधीत समाज कल्याण विभागातर्फे जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत सोमवारी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे, समाज कल्याण अधिकारी अक्षय कुरणे, अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह समाज कल्याण विभागाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.