नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत
schedule26 Aug 26 person by visibility 127 categoryराज्य
मुंबई : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत. या अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे:
🔗 माहिती नोंदवण्यासाठी लिंक:
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
नागरिकांना आवाहन –
जर नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी वरील लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी.
खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.
☎️ 1077 (टोल फ्री)
नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.