कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 : आलिय नासिर गोलंदाज यांची प्रचारामध्ये आघाडी; मतदारांचा वाढता प्रतिसाद
schedule10 Jan 26 person by visibility 196 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर प्रभागामध्ये मतदारांच्या गाठीभेटी प्रचार फेरीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 13 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवार आलिय नासिर गोलंदाज यांनी प्रभागांमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली असून त्यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 साठी प्रभाग क्रमांक 13 तून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. पूजा भूपाल शेटे, आलिय नासिर गोलंदाज, प्रवीण हरिदास सोनवणे, दीपक जयंत थोरात हे रिंगणात आहेत. प्रभागांमध्ये यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे .
दरम्यान प्रभाग क्रमांक 13 मधील आलिय नासिर गोलंदाज या शिक्षित उमेदवार असून प्रभागाची त्यांना जाण आहे. प्रभागाच्या समस्या विकास कामे याबाबत त्यांची विकासात्मक दृष्टी असून प्रभागाच्या सर्वांनी विकासासाठी तसेच काँग्रेसचा जाहीरनामा सत्यात उतरण्यासाठी त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. प्रभागांमध्ये त्यांचा मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधून आपली भूमिका पटवून देत आहेत. तसेच प्रचार फेरीतून त्यांनी आघाडी घेतली आहे तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार ही प्रभागांमध्ये जोरात दिसत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारांमध्ये समर्थकांचा मोठा प्रतिसाद सहभाग दिसून येत आहे.

