SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवभोजन योजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : छगन भुजबळजिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकणेरी मठाच्या पावन भूमीत कृषी महाविद्यालयाच्या 'श्रमसंस्कार' शिबिराचा समारोप!पंधरा दिवसांत ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेअमृत संस्थेच्या वतीने १५ मार्च रोजी उद्योजकांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावाशिक्षणशास्त्र अधिविभागात महिला दिन साजराडॉ. देवानंद शिंदे, अनिता शिंदे यांना ‘यशवंत-वेणू सन्मान’ पुरस्कारकरवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा; राष्ट्रवादीचा सभापती तर उपसभापतीपद भाजपकडेप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ कार्यशाळा उत्साहात

जाहिरात

 

शिवभोजन योजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : छगन भुजबळ

schedule10 Mar 26 person by visibility 100 categoryराज्य

मुंबई : राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात सकस भोजन उपलब्ध करून देणारी 'शिवभोजन योजना' अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे अन्न,नागरी,पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. आमदार सना मलिक यांनी विधानसभेत याविषयाची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

अन्न नागरी पुरवठा मंत्री भुजबळ म्हणाले की, सध्या संपूर्ण राज्यात १८७३ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. २०२५-२६ या आर्थिक  वर्षासाठी सुधारित अंदाजपत्रकानुसार ₹२२०.०० कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी देखील ₹१२० कोटींची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हा निधी प्राप्त होताचा मार्चनंतर निधी वितरीत करणार आहे. शिवभोजन योजनेच्या देयकांचे वितरण उप नियंत्रक शिधावाटप, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या स्तरावर नियमितपणे केले जाते. क्षेत्रीय यंत्रणेला निधी वितरणासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ निरंतर मिळत राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes