SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवभोजन योजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : छगन भुजबळजिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकणेरी मठाच्या पावन भूमीत कृषी महाविद्यालयाच्या 'श्रमसंस्कार' शिबिराचा समारोप!पंधरा दिवसांत ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेअमृत संस्थेच्या वतीने १५ मार्च रोजी उद्योजकांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावाशिक्षणशास्त्र अधिविभागात महिला दिन साजराडॉ. देवानंद शिंदे, अनिता शिंदे यांना ‘यशवंत-वेणू सन्मान’ पुरस्कारकरवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा; राष्ट्रवादीचा सभापती तर उपसभापतीपद भाजपकडेप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ कार्यशाळा उत्साहात

जाहिरात

 

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

schedule10 Mar 26 person by visibility 81 categoryराज्य

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा  हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.

सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.

शपथविधी सोहळ्याला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे व  इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes