कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात मित्राकडून मित्राच्या डोक्यात दगड घालून निघृण खून
schedule04 Jan 26 person by visibility 180 categoryगुन्हे
कोल्हापूर : विक्रमनगर परिसरातील दारू अड्यावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत आईवरून शिवीगाळ केल्याच्या कारणातून चिडून मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून निघृण खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.विकास दत्तात्रय भोसले (वय ३३, रा. येल्लूर, ता. शाहूवाडी, सध्या रा. विक्रमनगर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आरोपी ओंकार महादेव काळे (वय २५, रा. शाहू कॉलनी, तिसरी गल्ली विक्रमनगर, कोल्हापूर) याला रात्री उशिरा अटक केली.
विकास हा मूळचा शाहूवाडी तालुक्यातील होता. कामानिमित्त कोल्हापुरात होता. त्याची विक्रमनगर परिसरातील ओंकार काळे याच्यासोबत मैत्री होती. शनिवारी दिवसभरही ते एकत्र होते. रात्री दारू पिण्यासाठी ते जोशी गल्ली परिसरात गेले. त्या ठिकाणी काही वेळ गप्पाही मारल्या. त्यानंतर बोलण्याच्या कारणावरून दोघांत वाद झाला.
ओंकारने शिवीगाळ करत विकास याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने दारूच्या नशेत त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे विकास हा गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांना त्याला जखमी अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी आरोपी ओंकार काळेला अटक केली.

