दिवाळीच्या आनंदात सामाजिक भान जपत चेतना, स्वयंम् व सिद्धगिरीच्या विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या वस्तूंची खरेदी करा; मान्यवरांचे आवाहन
schedule01 Nov 26 person by visibility 132 categoryसामाजिक
◼️ कोल्हापुरात प्रथमच तीन संस्थांचा संयुक्त दिवाळी भेटवस्तू विक्री उपक्रम
कोल्हापूर : दिवाळीचा आनंद साजरा करताना सामाजिक भान आणि सामाजिक जबाबदारीचे भानही जपले पाहिजे. यासाठी चेतना, इंडियन रेडक्रॉस संलग्न स्वयंम् आणि सिद्धगिरी गुरुकुल गोशाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार वस्तूंची दिवाळी भेट म्हणून खरेदी करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन विविध मान्यवरांनी केले.
गुरु महाराज वाडा, मोतीबाग तालीम शेजारील तसेच हेम फॅब्रिकलगत असलेल्या विहिंप संलग्न सबनीस स्मृती भवन येथील 'शायरन फॉर ऑल' या केंद्रात या तिन्ही सामाजिक संस्थांच्या संयुक्त दिवाळी भेटवस्तू विक्री उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी हृदयस्पर्शी परिवाराचे पद्माकर कापसे यांनी या उपक्रमाची व्याप्ती भविष्यात सर्वत्र वाढावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. एसपी नाईन टीव्हीचे संपादक सागर पाटील यांनी कोल्हापूरच्या विधायक सामाजिक परंपरेत या संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. या संस्थांमधील विद्यार्थ्यांचे आत्मिक बळ वाढविण्यासाठी समाजातील प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्वामी विवेकानंद ट्रस्टचे किशोर घाटगे यांनी कोल्हापुरातील प्रमुख चौकांसह विविध तालीम संस्थांमध्ये भविष्यात या तिन्ही संस्थांचे विक्री स्टॉल सुरू करण्यासाठी नियोजन करण्याचा मनोदय व्यक्त केला.
ज्येष्ठ फोटोग्राफर संजय साळवी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री सुनील ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. परगावाहून येणारे भाविक, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना या केंद्राच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन व विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
यावेळी शांतिदूत फाउंडेशन दिल्ली यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल किशोर घाटगे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कोल्हापुरात प्रथमच तीन सामाजिक संस्थांनी एकत्र येत दिवाळी भेटवस्तू खरेदी-विक्रीचा अभिनव उपक्रम राबविला आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच सामाजिक संस्थांच्या कार्यालाही बळ मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन संयोजिका सीमा मकोटे यांनी केले.
भाविक-पर्यटकांसाठी कायमस्वरूपी मार्गदर्शन सेवा केंद्र उभारण्याचा संकल्प समारोपप्रसंगी आरोग्यमित्र व पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले. 'शायरन फॉर ऑल' या केंद्राच्या माध्यमातून केवळ हंगामी सेवा न देता परगावाहून कोल्हापुरात येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी आरोग्य, निवास, आहार, मार्गदर्शन आणि आवश्यक माहिती उपलब्ध करून देणारी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ फोटोग्राफर संजय साळवी, सागर ठाणेकर,हेम फ्रेबिक चे निर्मल पगारीया ,राहूल कांबळे शिवाजी मांगले कर विजय यशपुत युवराज राऊत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.