सी. पी. राधाकृष्णन यांचा भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी
schedule12 Sep 25 person by visibility 160 categoryदेश

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांना आज राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम येथे पदाची शपथ दिली.
या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.