कोल्हापुरात भीषण अपघात: पुलावरून कार ४० फूट ओढ्यात कोसळली, एकाचा मृत्यू, तिघे जखमी
schedule03 Jun 26 person by visibility 386 categoryगुन्हे
कोल्हापूर: तावडे हॉटेल ते शिरोली जकात नाक्यादरम्यान कार पुलावरून ४० फूट खाली ओढ्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ही दुर्देवी घटना घडली.
दुर्गाप्रसाद उर्फ दुर्गेश उवाप्पा ईटी (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर अर्जुन चौगुले, रोहित माने आणि रोहित जोंधळे हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाजार आटोपून परतताना रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पुलाच्या कठड्याला धडकून थेट ओढ्यात कोसळली.
अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तत्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली.