माजी सेबी प्रमुख माधवी पुरी- बूच यांच्यावर गुन्हा दाखल होणार
schedule02 Mar 25 person by visibility 383 categoryदेश

नवी दिल्ली: शेअर बाजारातील घोटाळाप्रकरणी सेबीच्या माजी प्रमूख माधवी बूच पूरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. प्रकरणी विशेष न्यायालयाने एन्टी करप्शन ब्युरोला माधवी बूच पुरी व अन्य अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे विशेष एसीबी न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी शनिवारी हे आदेश पारित केले आहेत.
प्रथमदर्शनी मिळालेल्या पुराव्यानुसार संगनमताने घोटाळा झाल्याचे निर्दशनास आले आहे. याची निपःक्ष पणे चौकशी होणे गरजेचे आहे ३० दिवसांत याचा अहवाल द्यावा लागेल असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या संदर्भात केलेल्या याचिकाकर्त्यांने विविध गंभीर आरोप केले आहेत. कार्पोरेट फसवणूक झाली असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणने आहे.