SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुंबईत स्वतंत्र नाट्यगृह व चित्रपटगृह उभारणार : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारकोल्हापूर महापालिकेच्यावतीने जागतिक क्षयरोग दिन विविध उपक्रमांनी साजरासाखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीने राज्यस्तरीय समिती गठीतइंधन टंचाईच्या चर्चा केवळ अफवा; कोल्हापुरात 'पॅनिक बायिंग' टाळण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे स्पष्ट निर्देशमान्सूनपूर्व नाले व चॅनल सफाई मोहिमेला सुरुवात; ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन"बिद्रीत गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; फॉर्च्युनरसह १२ लाखांची रोकड जप्त!"सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा पुढाकार, ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरणक्षयरोगमुक्तीचा संकल्प: जागतिक क्षयरोग दिनाचे महत्त्व आणि आपली जबाबदारीपोलीस प्रशासनाचा 'खाक्या'! हुपरीतील "एस. एम. बॉईज गॅग" टोळीवर हद्दपारीचे अस्त्र; एका वर्षासाठी कोल्हापूर जिल्हाबंदीशिवाजी विद्यापीठातील ऑनलाइन एम.बी.ए.अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया येत्या ३० मार्च पर्यंत मुदत

जाहिरात

 

"बिद्रीत गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; फॉर्च्युनरसह १२ लाखांची रोकड जप्त!"

schedule24 Mar 26 person by visibility 213 categoryगुन्हे

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिद्री येथील 'श्रद्धा हॉस्पिटल'मध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मुख्य सूत्रधार डॉक्टर. युवराज पाटील आणि त्याचा एजंट संभाजी वसंत शिंदे या दोघांना रंगेहाथ अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १२ लाख ३० हजार रुपयांची रोकड आणि महागडी फॉर्च्युनर गाडी जप्त केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात काही डॉक्टरांकडून बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व स्त्रीभ्रूण हत्या केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांना मिळाली होती. याची सत्यता पडताळण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी एका चार महिन्यांच्या गर्भवती महिलेला 'बनावट ग्राहक' म्हणून पाठवले. एजंट संभाजी शिंदे याने या चाचणीसाठी २२ हजार रुपयांची मागणी केली. डॉक्टर युवराज पाटील यांनी चाचणी प्रक्रिया सुरू करताच पोलिसांनी धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले.

या छाप्यात पोलिसांनी केवळ पैसेच नव्हे, तर गुन्ह्यात वापरले जाणारे एक 'पोर्टेबल सोनोग्राफी मशीन', गर्भपाताच्या गोळ्यांची पाकिटे, जेलच्या बाटल्या, दोन सॅमसंग टॅब आणि तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, डॉक्टर युवराज पाटील याच्यावर यापूर्वीही राधानगरी आणि भुदरगड पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.


ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस आता या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत, याचा अधिक तपास करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes