रस्त्याची गुणवत्ता व दर्जाची वेळोवेळी तांत्रिक सल्लागारामार्फत तपासणी करा : प्रशासक के.मंजूलक्ष्मी
schedule13 May 24 person by visibility 322 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियांना अंतर्गत शहरामध्ये सुरु असलेल्या रस्ते विकास प्रकल्पाची बैठक आज सकाळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. नगरोत्थान योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या रस्त्यांची गुणवत्ता व दर्जाची तांत्रिक सल्लागार यांचेमार्फत वेळोवेळी तपासणी करुन घेणेच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता उपशहर अभियंता सतीश फप्पे, आर.के.पाटील, रमेश कांबळे, महादेव फुलारी, प्रकल्प सल्लागार संदिप गुरव व ठेकेदार एव्हरेस्ट इन्फ्राचे डायरेक्टर अशोक भोसले व मॅनेजर सत्तार मुल्ला उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मंजूर रस्ते निहाय कामाचा सविस्तर आढावा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतला. यावेळी त्यांनी महापालिकेने प्रथम प्राधान्याने दिलेले 5 रस्ते ठेकेदार यांनी दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. सुरु असलेल्या प्रत्येक कामावर ठेकेदाराचे प्रतिनिधी, सल्लागार व विभागीय कार्यालयाकडील संबंधित अभियंता यांनी स्वत: उपस्थित राहुन काम करुन घेण्याचे आदेश दिले. या प्रकल्पांतर्गत मंजूर रस्ते करणेपूर्वी गॅस पाईप लाईन व पाणी पुरवठा पाईप लाईन प्रस्तावित असलेस सदरची कामे त्वरीत पूर्ण करुनच रस्त्याचे काम सुरु करणेचे निर्देश ठेकेदारास प्रशासकांनी दिले. त्याचबरोबर प्रस्तावित रस्त्यावर येणारे अडथळे त्वरीत काढून ठेकेदारांना काम करण्यासाठी रस्ता उपलब्ध करुन देणेचे आदेश सर्व उप-शहर अभियंता यांना दिले.
तसेच प्रकल्पाकरीता नियुक्त करण्यात आलेले पुणे कॉलेज ऑफ इंजिनिरिंगचे तांत्रिक लेखापरिक्षक वाय.टी.लोमटे-पाटील यांना प्रत्येक रस्त्याच्या गुणवत्तेबाबतची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याच्या सूचना प्रशासकांनी यावेळी दिल्या.