महायुतीच्या विकासकामांवर नागरिकांचा विश्वास; प्रभाग ११ मधून शंभर टक्के विजय निश्चित : सत्यजित जाधव
schedule08 Jan 26 person by visibility 209 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा शाश्वत व सर्वांगीण विकास साधण्यासाठी महायुती सरकार सातत्याने प्रयत्नशील असून शहरातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. या विकासकामांची दखल घेत जनता महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहत असल्याचा विश्वास प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेनेचे उमेदवार सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या उमेदवारांनी संयुक्तपणे प्रभागातील विविध भागांत प्रचारफेरी काढून मतदारांशी संवाद साधला. शिवसेनेचे सत्यजित जाधव, भाजपच्या माधुरी नकाते व निलांबरी साळोखे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशोदा मोहिते यांनी वारेवसाहतसह इतर भागांत प्रचार केला. प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
उमेदवारांनी घरोघरी भेटी देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या व महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती दिली.
दरम्यान, महायुतीच्या प्रचारार्थ डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली टिंबर मार्केट, लाड चौक परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. “कोण म्हणतं येत नाही, आल्याशिवाय राहत नाही; सत्यजित जाधव आगे बढो, हम तुम्हारे साथ है,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सिद्धाळा गार्डन, टिंबर मार्केट व पद्मावती गार्डन येथे झालेल्या प्रचारफेरीत महिला मतदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी सचिन पाटील, श्रीकांत मंडलिक, विकास शिरगावे, धीरज गायकवाड, योगेश घाडगे, अविनाश कामटे, राजू पाटील, पिंटू कांदेकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

