SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहातडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशजीवनात येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा : संग्राम पाटील; डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण गडहिंग्लज-आजरा 'बायपास'साठी धनंजय महाडिक संसदेत कडाडले; वाढत्या अपघातांकडे वेधले लक्ष!‘गोकुळ’ मार्फत महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतराव चव्‍हाण यांना अभिवादन ...परिवहन समितीचे नूतन सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर; केएमटी स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेसुधारित आकृतीबंध आणि फेरीवाला समितीच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना (उबाठा) आक्रमक; आजपासून महापालिकेसमोर लाक्षणिक साखळी उपोषण!आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाणकोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोध

जाहिरात

 

‘गोकुळ’ मार्फत महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतराव चव्‍हाण यांना अभिवादन ...

schedule12 Mar 26 person by visibility 150 categoryउद्योग

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या  ताराबाई पार्क येथील विकासकक्ष कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री स्‍व. यशवंतराव चव्‍हाण यांची ११३ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते स्‍व. यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.

 यावेळी बोलताना संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्‍हणाले, महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या विकासासाठी भक्कम पाया घातला. सहकार चळवळीला बळ देत ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला आर्थिक स्थैर्य देण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात सहकार क्षेत्र अधिक मजबूत झाले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्थेला दिशा देण्यामध्येही यशवंतराव चव्हाण यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. गावपातळीवर लोकसहभागातून विकास घडवून आणण्याची संकल्पना त्यांनी रुजवली. आजही सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण विकास घडवताना त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळत राहते.

या कार्यक्रमाप्रसंगी संघाचे संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त केली तर कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक डॉ.एम.पी.पाटील यांनी केले. तर आभार पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे यांनी मानले.

   यावेळी गोकुळचे माजी चेअरमन, ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक अजित नरके, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही.तुंरबेकर, दत्तात्रय वागरे, बाजीराव मुडूकशिवाले, अशोक पुणेकर, संभाजी पाटील, संग्राम पाटील, प्रताप पाटील, विनोद वानखेडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.

                      

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes