डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यश
schedule12 Mar 26 person by visibility 149 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागाचे माजी विद्यार्थी अथर्व संतोष पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत देशात ३२ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले. भारतीय नौदलात सब लेफ्टनंट पदावर त्याची निवड झाली आहे.
संतोष हे २०२४ बॅचचे विद्यार्थी आहेत. अत्यंत स्पर्धात्मक आणि कठीण मानल्या जाणाऱ्या यूपीएससी सीडीएस परीक्षेत मिळवलेले हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाच त्यांनी शिस्तबद्ध तयारी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.ए. के . गुप्ता , प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे तसेच एआयएमएल विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी अथर्व पाटील यांचे अभिनंदन केले.