राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण रंकाळा परिसराची स्वच्छता
schedule02 Oct 25 person by visibility 104 categoryमहानगरपालिका

▪️स्वच्छता मोहिमेतून 2 टन कचरा, प्लास्टिक व तनकट उठाव
कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त " स्वच्छ भारत दिन" साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्यावतीने सकाळी ७ ते ९ या वेळेत संपूर्ण रंकाळा परिसरात महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली हि महास्वच्छता मोहीम घेण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत 2 टन कचरा, प्लॅस्टिक व तनकट काढण्यात आले.
या मोहिमेत वृक्ष प्रेमी संस्था, केएमसी कॉलेज एनसीसीचे विद्यार्थी, अवनी संस्था, अर्थ वॉरिअर्स, शाहू सेना व बावडा रेस्क्यू फोर्सचे सदस्यांनी सहभाग नोंदवून रंकाळा परिसराची स्वच्छता केली. यावेळी महापालिकेच्या प्रबुध्द भारत हायस्कूल, महाराणा प्रताप हायस्कूल, महात्मा फुले विद्यालय, यशवंतराव चव्हाण विद्यालय, नागोजीराव पाटणकर विद्यालय व गुरुदेव विद्यालय मधील 175 विद्यार्थ्यां व शिक्षकांनी रंकाळा परिसरात प्रभात फेरी काढून स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
या स्वच्छता मोहिमेत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, अरुण गुजर, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, जयवंत पवार, कामगार अधिकारी राम काटकर, नगरसचिव सुनील बिद्रे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, ग्रंथपाल रत्नाकर जाधव, कनिष्ठ अभियंता अरुण गवळी, पदमल पाटील, प्रमोद बराले, पर्यवेक्षक विजय माळी, क्रिडा निरिक्षक सचिन पांडव, स्वछता दूत अमित देशपांडे व महापालिकेच्या विविध विभागाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.