SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात संपन्नमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेटरोटरीचा उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरेल : खासदार धनंजय महाडिक; कोल्हापूर कॅन्सर सेंटरला डिजिटल मॅमोग्राफी प्रदानकोल्हापूरच्या ऐतिहासिक नगारखान्यास १९१ वर्ष पूर्ण: ‘शौर्यगाथा’ कार्यक्रमात शाहू महाराज आणि जिल्हाधिकाऱ्यांचा सहभागस्वच्छतेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोल्हापूर महापालिका आरोग्य कर्मचारी व विविध सेवाभावी संस्थांचा सन्मानराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण रंकाळा परिसराची स्वच्छताजागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक संधीराज्यातून मान्सून ८ ऑक्टोबर पासून निरोप घेणारनगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

जाहिरात

 

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात

schedule02 Oct 25 person by visibility 72 categoryराज्य

कोल्हापूर : सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाच्यावतीने आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळवण्याच्या दृष्टीने सरकारकडून विविध योजना राबविल्या जात असून, त्यांना समाजातील योग्य स्थान मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सहायक आयुक्त सचिन साळे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

डॉ. महेंद्र कानडे म्हणाले,  आरोग्य तपासणी, नियमित व्यायाम आणि योग्य उपचार यामुळे वृद्धांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यास मदत होऊ शकते. तसेच त्यांचे म्हणणे आहे की ज्या वृद्ध व्यक्ती दररोज चालतात, हलके व्यायाम करतात, संतुलित जेवण जेवतात आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहतात त्यांना आरोग्याची गुंतागुंत होण्याची शक्यता खूपच कमी असते. रोग लवकर ओळखण्यासाठी आणि वेळेवर उपचार सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी देखील महत्त्वपूर्ण ठरत आहे, अशी माहिती डॉ. कानडे यांनी मार्गदर्शन प्रसंगी दिली. 

कसे जगावे कणकणत....की गाणे म्हणत....! अशा संदेशामधून आपले जीवन जगत असताना ते आनंदाने जगले पाहिजे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना तणावमुक्त विरहित जीवन कसे जगले पाहिजे. तसेच आपले सकारात्मक जीवन कसे असायला हवे याबाबत खूप चांगल्या प्रकारे आपल्या विनोदी शैलीमधून उपस्थित जेष्ठ नागरिकांना विजयसिंह भोसले यांनी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग आयोजित ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उपस्थित असणाऱ्या जेष्ठांना मार्गदर्शन केले. 

1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांच्या अध्यक्षतेखाली व इतर बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सुनीता नेर्लीकर, इतर बहुजन कल्याण अधिकारी अमित घवले, विशेष समाजकल्याण अधिकारी अक्षय कुरणे,  सहायक लेखा अधिकारी कल्पना गायकवाड, वरिष्ठ समाज कल्याण समाज कल्याण निरीक्षक सुप्रिया काळे, समाज कल्याण निरीक्षक अतुल पवार व  समाज कल्याण निरीक्षक सुनिल पाटील याचबरोबर फेसकॉम संघटनेचे डॉ. सुशिला औडीयार यांनी जेष्ठ नागरिकांसाठी आपल्या कवितेमधून भावना व्यक्त केल्या.  मानसिंग जगताप, फेस्कॉम संघटनेचे सदस्य, जिल्हा जेष्ठ नागरिक समन्वय समितीचे सदस्य, कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन परब, तालुका समन्वयक तर आभार सचिन पाटील, कार्यालयीन अधीक्षक यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चित्रा शेंडगे, समाज कल्याण निरीक्षक, शाहू प्रधान कनिष्ठ लिपिक, सचिन कांबळे, तालुका समन्वय तसेच मुख्यमंत्री युवा कौशल्य कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थी यांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes