SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीई-मध्ये गणेशोत्सव २०२५ अंतर्गत गड किल्ल्यांचे सादरीकरणरविवारपासून दैनंदिन पाणी पुरवठा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजनमाजी सैनिक संपर्क मेळाव्याचे बेळगावात आयोजनचूक प्रशासनाची खापर थेट पाईपलाईन योजनेवर हे बरोबर नाही; काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी कोल्हापूर शहरातील पाणीटंचाई बदल अधिकार्‍यांना विचारला जाब कोल्हापुरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीस अटक शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात'कॉसमॉस' चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा 'डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ : नविद मुश्रीफ; गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गोकुळची खास भेटवारणा विद्यापीठाच्या वारणा स्कूल ऑफ लॉ प्रवेशासाठी शेवटची संधी; नवीन नोंदणी व विकल्प अर्जासाठी तारखा जाहीरआझाद मैदानावर भगव वादळ : डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलणार नाही : मनोज जरांगे

जाहिरात

 

स्टार्टअपच्या यशस्वीतेसाठीची समन्वय व सहकार्य असणारी पूरक यंत्रणा आवश्यक : डॉ.कार्थिक संकरण; केआयटी आय.आर.एफ.च्या वतीने कोहोर्ट १.० लॉन्च कार्यक्रम संपन्न

schedule25 Apr 24 person by visibility 589 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनच्या वतीने कोहोर्ट १.० लॉन्चचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार ,२० एप्रिल २०२४ रोजी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेमध्ये नवउद्योजक, उद्योग मार्गदर्शक यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. कोल्हापूर येथील रेसिडेन्सी क्लब मध्ये या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.कार्थिक संकरण ,सीईओ, देशपांडे स्टार्टअप्स हुबळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात स्टार्टअप चे महत्व,ते यशस्वी होण्यासाठी लागणारी यंत्रणा व तसेच त्या यंत्रणेच्या घटकातील समन्वय,सहकार्य अशा विषयाला घेऊन सहभागी लोकांशी संवाद साधला. अशा प्रकारच्या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.

दिवसभरातील झालेल्या "स्टार्टअप स्ट्रॅटेजीज: नेव्हिगेटिंग चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज" या विषयावरील पॅनल चर्चेमध्ये स्टार्टअप वाढीसाठी आवश्यक अशा पैलूंवरती चर्चा करण्यात आली. या सत्रातून अनेक व्यावहारिक अडचणी त्याच पद्धतीने या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपली धोरणे कशी असली पाहिजे याबाबत स्पष्टता आली. या चर्चेचे अध्यक्ष केआयटी संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी होते. देशपांडे स्टार्टप्स हुबळी चे रक्षित कल्याणी यांच्यासह तुषार कामत, रणधीर पटवर्धन, यशांक गोकाणी , डॉ. अमित सरकार ,डॉ. सचिन शिंदे आणि यश राऊत यांनीही आपले वैचारिक योगदान या सत्रात दिले.केआयटी मधील इनक्युबेशनशी संलग्नित असलेल्या स्टार्टअपनी आपली सादरीकरणे या कार्यशाळेमध्ये सादर केली. सहभागी मान्यवरांनी या नवोद्योजकांना मार्गदर्शन केले व आपला अभिप्रायही दिला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केआयटी च्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ सुधीर आरळी यांनी केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष सुनील कुलकर्णी उपाध्यक्ष साजिद हुदली सचिव दीपक चौगुले वरिष्ठ विश्वस्त सचिन मेनन ,संचालक डॉ.मोहन वनरोट्टी उपस्थित होते. संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी या कार्यशाळेचा समारोप केला. 

या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये इंक्युबॅशन मॅनेजर देवेंद्र पाठक, इंक्युबेशन असोसिएटस पार्थ हजारे व अंजोरी कुंभोजे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कार्यशाळेसाठी नवउद्योजक व परिसरातील वरिष्ठ उद्योजकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes