SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपलाडॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला : कुलगुरू डॉ. राजनीश कामतज्ञानतपस्वी हरपले! शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधनकेशवराव भोसले नाट्यगृहासह विविध विकासकामांचे ९ ऑगस्टला लोकार्पण

जाहिरात

 

शहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

schedule04 Aug 26 person by visibility 113 categoryराज्य

कोल्हापूर  : कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकांनी सुरु असलेल्या शहरातील सर्व ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिल्या.

पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृह येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी निखिल घर, नगरप्रशासन जिल्हा सहआयुक्त देवानंद ढेकळे, कोल्हापूर महानगरपालिका जल अभियंता हर्षजित घाटगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, इचलकरंजी मनपाच्या सुषमा शिंदे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, कोल्हापूर पाटबंधारे उप विभागीय अधिकारी प्रकाश येरुले, एमआयडीसीचे  एन. एस. दुधाळे, कुरुंदवाड, शिरोळ, हुपरी, हातकणंगले, मलकापूर पालिकेचे मुख्याधिकारी तसेच विविध कंपनीचे सल्लागार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणाले, कोल्हापूर शहरातील जयंती नाला, दुधाळी, लाईन बाजार व बापट कॅम्प या क्षेत्रातील तसेच इचलकरंजी शहरातील ड्रेनेजची व रस्त्यांची कामे अतिरिक्त मनुष्यबळ वापरुन तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रंकाळा तलावात सांडपाणी मिसळू नये यावर उपाययोजना करा त्याचबरोबर या तलावावर कपडे धुणे, कचरा टाकणे या बाबी होऊ नये म्हणून पथकाची नेमणुक करा व कामाची एक एसओपी तयार करुन विविध विभागाने कामकाज वाटप करुन त्यानुसार कामे करण्यात यावीत. तलाव व नदीमधील प्रदूषण रोखण्यासाठी आगामी गणेशोत्सवा दरम्यान गणेश विसर्जनासाठी शहराच्या ठिकठीकाणी कृत्रिम कुंडाची व्यवस्थाही करण्यात यावी.

 महापालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नाल्यातून किंवा प्रत्यक्ष नदीपात्रात जात असेल तर अशा ठिकाणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपरिषद, जलसंपदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, विभागासह इतर विभागामार्फत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes