SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पेपरफुटी विरोधात कोल्हापुरात आज शनिवारी काँग्रेसचे धरणे आंदोलन व कॅन्डल मार्चपाऊलखुणा न्यायाच्या आणि समानतेच्या: ‘आंतरराष्ट्रीय लाल शू दिवस’नीट पेपर लीक: केंद्र सरकारची कठोर कारवाई; एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टीवारीच्या सेवेतून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पंढरपुरात 'निर्मलवारी-समृद्धवारी' व 'चरणसेवा' उपक्रमाचा समारोप संपन्नकोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजनेचे सर्वप्रथम दोन क्लस्टर कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातकेडीसीसी बँकेला लावलेला दंड भरण्याची माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची तयारी केडीसीसी बँकेला लावलेला दंड भरण्याची माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची तयारी गोविंदराव टेंबे महाराष्‍ट्राचे उपेक्षित साहित्यिक: सुधीर पोटेकोल्हापुरात उद्या होणार 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती राष्ट्रीय अभियान २०२६' चा महासमापन सोहळाशिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी - डॉ. संपत खिलारी

जाहिरात

 

पेपरफुटी विरोधात कोल्हापुरात आज शनिवारी काँग्रेसचे धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च

schedule25 Jul 26 person by visibility 150 categoryराजकीय

🟣राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

​कोल्हापूर: देशभरात सातत्याने होणाऱ्या परीक्षांच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी व पालकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारच्या दुर्लक्षा विरोधात आणि पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शनिवारी (२५ जुलै) कोल्हापुरात भव्य धरणे आंदोलन व कँडल मार्च आयोजित करण्यात आला आहे. ​अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे राज्यव्यापी आंदोलन छेडले जात आहे. ​कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरामध्ये राजाराम गार्डन जनता बाझार चौक राजारामपुरी येथे सायंकाळी ५:०० ते ७:०० या वेळेत हे आंदोलन होणार आहे. ​​सायंकाळी ५ ते ६ या दरम्यान राजाराम गार्डन जनता बाझार चौक राजारामपुरी येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल.

​सायंकाळी ६ ते ७ या वेळेत राजाराम गार्डन येथून 'आईचा पुतळा' मार्गे सायबर कॉलेज पर्यंत कँडल मार्च काढण्यात येईल. या आंदोलनात खासदार शाहू छत्रपति, काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, गणपतराव पाटील, सुर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, शशांक बावचकर, संजय कांबळे, तौफिक मुल्लाण्णी, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, इंद्रजीत बोंद्रे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, तालुकाध्यक्ष, जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, महिला, कार्यकर्ते, युवक काँग्रेस, एनएसयूआयचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित राहणार आहेत. 

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सरकारला जागा करण्यासाठी कोल्हापुरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, तरुण आणि पालकांनी या धरणे आंदोलन व कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष प्रविण केसरकर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes